
काश्मीरच्या नंदनवनात म्हणजेच पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये युद्धाचे ढग निर्माण झाले आहेत. भारताने पाकिस्तानविरोधात लष्करी कारवाईच्या तयारीला सुरूवात केली असून, पाकिस्तानने देखील युद्धसरवाला सुरूवात केल्याची माहिती आहे.
अशातच ७ मे रोजी देशभरात मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. भारतातील २४४ ठिकाणी मॉक ड्रिल घेण्यात येणार असून, यात महाराष्ट्राचा देखील समावेश आहे. महाराष्ट्रातील १६ ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे. मॉक ड्रीलमध्ये सामान्य जनतेला युद्धसदददृ्श परिस्थिती निर्माण झाल्यावर नेमकं काय करावं? याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार ७ मे रोजी देशातील २४४ ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार देखील अलर्ट मोडवर आले आहे. सर्व मंत्र्यांना प्रशासनासोबत संपर्कात राहण्याचे निर्देश देण्यात आले असून, राज्यातील १६ ठिकाणी मॉक ड्रिलचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील नेमकं कोणकोणत्या ठिकाणी मॉक ड्रिल होणार? याची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.
राज्यातील १६ ठिकाणी होणार मॉक ड्रिल
राज्यातील आर्थिक राजधानी मुंबई
तारापूर
उरण- जेएनपीटी
ठाणे
पुणे
थळ - वायशेत
नाशिक
मनमाड
सिन्नर
रोहा - धाटाव - नागोठाणे
छत्रपती संभाजीनगर
राजगड
भुसावळ
रत्नागिरी
सिंधुदुर्ग
कोल्हापुरात कडेकोट बंदोबस्त
मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरामध्ये शस्त्रधारी पोलिसांची सुरक्षा वाढवली आहे. अंबाबाई मंदिर हे अत्यंत महत्त्वाचं मंदिर आहे. त्यातच सलग सुट्ट्यांच्यामुळे पर्यटक भाविक मोठ्या संख्येने अंबाबाई मंदिरात दाखल झाले आहेत. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांच्या वतीने सध्या कडक बंदोबस्त ठेवला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.