Mock Drill: काश्मीर ते केरळ अन् महाराष्ट्र, देशातील २४४ जिल्ह्यांमध्ये होणार मॉक ड्रील; सरकारच्या काय आहेत उपाययोजना?

Mock Drill Alert: केंद्र सरकारने ७ मे रोजी देशभरात मॉक ड्रिल आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील एकूण २४४ ठिकाणी ही मॉक ड्रिल पार पडणार आहे.
Mock Drill
Mock DrillSaam
Published On

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये अधिक तणाव निर्माण झालाय. दोन्ही देशातील हा तणाव अधिक वाढत चालला आहे. पाकिस्तानविरोधात भारताने लष्करी कारवाईच्या तयारीला सुरूवात केलीय. अशातच केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आदेशानुसार, ७ मे रोजी देशभरात मॉक ड्रील घेण्यात येणार आहे. भारतातील एकूण २४४ ठिकाणी मॉक ड्रील घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अलिकडेच केंद्रीच मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते गृहमंत्री अमित शहापर्यंत सर्वांनी तिन्ही लष्कर प्रमुखांची भेट घेतली. या बैठकीत मॉक ड्रीलबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. या निर्णयाबाबत एक यादी समोर आली आहे. या यादीत २४४ जिल्ह्यांच्या नावांचा समावेश आहे. आजपासूनच या जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रीलच्या तयारीला सुरूवात करण्यात आली आहे.

Mock Drill
Pune News: मुकबधीर मुलगी ओट्यावर बसली होती, नराधम आला अन्.. अश्लील कृत्याप्रकरणी आरोपीला सक्तमजुरी

राजस्थानमधील जिल्हे: कोटा, रावतभाटा, अजमेर, अलवर, बारमेर, भरतपूर, बिकानेर, बुंदी, गंगानगर, हनुमानगड, जयपूर, जैसलमेर, जोधपूर, उदयपूर, सीकर, सुरतगड, आबू रोड, नसीराबाद (अजमेर), भिवाडी, फुलेरा (जयपूर), नागौर (मेरता रोड), जालोर, बेवार (अजमेर), लालगड (गंगानगर).

उत्तर प्रदेशमधील जिल्हे: बुलंदशहर (नरोरा), आग्रा, अलाहाबाद, बरेली, गाझियाबाद, गोरखपूर, झाशी, कानपूर, लखनौ, मथुरा, मेरठ, मुरादाबाद, सहारनपूर, वाराणसी, बक्षी-का-तलाब, मुघल सराई, सारसावा, बागपत, मुझफ्फरनगर.

हरियाणातील जिल्हे: अंबाला, हिसार, फरीदाबाद, गुडगाव, पंचकुला, पानिपत, रोहतक, सिरसा, सोनीपत, यमुना नगर, झज्जर.

गुजरातमधील जिल्हे: देखावा, वडोदरा, अहमदाबाद, जामनगर, गांधीनगर, भावनगर, काकरापूर, कांडला, नळ्या, अंकलेश्वर, ओखा, वाडीनार, भरूच, दांग, कच्छ, मेहसाणा, नर्मदा, नवसारी.

जम्मू-काश्मीरमधील जिल्हे: अनंतनाग, बडगाम, बारामुल्ला, डोडा, जम्मू, कारगिल, कठुआ, कुपवाडा, लेह, पुंछ, राजौरी, श्रीनगर, उधमपूर, सांबा, अखनूर, उरी, नौशेरा, सुंदरबनी, अवंतीपुर, पुलवामा.

पंजाबमधील जिल्हे: अमृतसर, भटिंडा, फिरोजपूर, गुरदासपूर, होशियारपूर, जालंधर, लुधियाना, पटियाला, पठाणकोट, अजिनामपूर, बर्नाला, भाक्रा-नांगल, हलवारा, कोथकपूर, बटाला, मोहाली (सासनगर), अबोहर, फरीदपूर, रोपर, संगरूर.

ओडिशा: तालचर, बालासोर, कोरापूट, भुवनेश्वर, गोपाळपूर, हिराकुड, पारादीप, राउरकेला, भद्रक, ढेंकनाल, जगतसिंगपूर, केंद्रपारा.

बिहार: पापणी, कटिहार, पटना, पूर्णिया, बेगुसराय.

Mock Drill
Beed News: बीडचं बिहार झालं! पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानीच गांजा फुकला, सुरक्षा रक्षकाने पाहताच..

आसाम: बोंगाईगाव, दिब्रूगड, धुबरी, गोलपारा, जोरहाट, शिवसागर, तिनसुकिया, तेजपूर, डिग्बोई, दिलीयाजान, गुवाहाटी, रंगिया, नामरूप, नाझिरा, उत्तर लखीमपूर, नुमालीगड, दरंग, गोलाघाट.

झारखंड: बोकारो, गोमिया, गोड्डा, साहेबगंज.

अरुणाचल प्रदेश: इटानगर, तवांग, हाय्युलिंग.

पश्चिम बंगाल: कूचबिहार, दार्जिलिंग, जलपाईगुडी, दुर्गापूर, ग्रेटर कोलकाता, हल्दिया, हाशिमारा, खरगपूर, आसनसोल, फरक्का, चित्तरंजन, बालुरघाट, अलीपूरद्वार, इस्लामपूर, दिनहाटा, मेखलीगंज, माथाभंगा, कालिम्पोंग, जलढाका, कुर्सियांग, कोलाघाट, वर्धमान, बीरभूम, पूर्व मेदिनीपूर, हावडा, हुगळी, मुर्शिदाबाद.

Mock Drill
Dr. Valsangkar: डॉ. वळसंगकर प्रकरणाचं गूढ वाढलं, सून आणि तिचे वडील परदेशात रवाना, नेमकं कारण काय?

मध्य प्रदेश: भोपाळ, इंदूर, ग्वाल्हेर, जबलपूर, कापणी.

गोवा: उत्तर गोवा, दक्षिण गोवा.

महाराष्ट्र: मुंबई, तारापूर, ठाणे, पुणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

लक्षद्वीप: लक्षद्वीप.

कर्नाटक: बेंगळुरू, मल्लेश्वर, रायचूर.

केरळ: कोचीन, तिरुवनंतपुरम.

Mock Drill
Nagpur: हळदीच्या कार्यक्रमात राडा, दारूच्या नशेत महिला अन् पुरूषांचा धिंगाणा; हाणामारीत २ चिमुकले गंभीर जखमी

मेघालय: पूर्व खासी हिल्स, जैंतिया हिल्स, पश्चिम गारो हिल्स.

मणिपूर: इंफाळ, चुराचांदपूर, उखरूल, मोरेह, नगांथौ-खोआंग.

इतर राज्ये व केंद्रशासित प्रदेश: चंदीगड, छत्तीसगड (दुर्ग-भिलाई), दादरा-नगर हवेली (सिल्वासा), दमण-दीव (दमण), पुद्दुचेरी, हिमाचल प्रदेश (शिमला), दिल्ली, अंदमान-निकोबार (पोर्ट ब्लेअर), तेलंगणा (हैदराबाद), आंध्र प्रदेश (विशाखापट्टणम), त्रिपुरा (अगरतळा), उत्तराखंड (देहरादून).

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com