Nagpur: हळदीच्या कार्यक्रमात राडा, दारूच्या नशेत महिला अन् पुरूषांचा धिंगाणा; हाणामारीत २ चिमुकले गंभीर जखमी

Nagpur Village Sees Violence at Haldi Function Three Held: हळदीच्या कार्यक्रमात जुन्या वादातून हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत दोन बालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Nagpur
NagpurSaam
Published On

हळदीच्या कार्यक्रमात जुन्या वादातून हाणामारीची घटना घडली आहे. या मारहाणीत दोन बालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे घडली असून, या घटनेनंतर पोलिसांनी कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकारानंतर परिसरात खळबळ उडाली असून, पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कामठी गावात हळदीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या हळदीच्या कार्यक्रमात शेजारच्या जुन्या वादातून दोन गटात बाचाबाची झाली. आरोपी अमित वाठोडे, अक्षय वाठोडे, शुभम गजभिये आणि एका महिलेने दारूच्या नशेत विनाकारण शिवीगाळ केली, ज्यामुळे हाणामारीला सुरुवात झाली.

Nagpur
Buldhana: मॉर्निंग वॉकला गेला अन् कारनं उडवले; बँक कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू, बुलढाण्यात खळबळ

या हाणामारीत काव्यांश पिल्ले (६ वर्ष) आणि त्याची मामेबहिण सानिया पिल्ले (१३ वर्ष) हे दोघे गंभीर जखमी झाले. आरोपींनी काठीने केलेल्या मारहाणीत ही मुले जखमी झाली असून परिसरात तणाव निर्माण झाला. या घटनेनंतर चिमुकल्यांना तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. सध्या त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Nagpur
12th Board: सस्पेन्स संपला! १२वीचा निकाल उद्या लागणार, पण किती वाजता? कसा पाहायचा? VIDEO

या घटनेनंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली असून, पोलिसांनी तात्काळ कारवाई करून अमित वाठोडे, अक्षय वाठोडे, शुभम गजभिये या तिघांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Nagpur
Murbad Crime: बस स्टॅण्डवर थांबला, अज्ञाताकडून कुऱ्हाडीने डोकं अन् मानेवर सपासप वार, जागीच मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com