Murbad Crime: बस स्टॅण्डवर थांबला, अज्ञाताकडून कुऱ्हाडीने डोकं अन् मानेवर सपासप वार, जागीच मृत्यू

52-Year-Old Man Hacked to Death with Axe: मुरबाड तालुक्यातील जांबुर्डे गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. गावाच्या बस स्टॅण्डवर ५२ वर्षीय भालचंद्र बिर्‍हाडे यांची कुऱ्हाडीने प्रहार करून निर्घृण हत्या करण्यात आली.
Crime
CrimeSaam tv
Published On

फय्याज शेख, साम टीव्ही

मुरबाड तालुक्यातील जांबुर्डे गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. जांबुर्डे गावाच्या स्टॅण्डवर एका ५२ वर्षीय व्यक्तीवर कुऱ्हाडीने प्रहार करून त्यांची हत्या करण्यात आली आहे. त्यांच्या मानेवर आणि डोक्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करून त्यांना संपवलं आहे. आरोपीने कुऱ्हाडीने वार केल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

भालचंद्र बिर्‍हाडे असे मृत ५२ वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. भालचंद्र हे बस स्टॅण्डवर उभे होते. यादरम्यान, अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यावर आणि मानेवर सपासप वार केले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Crime
बांधकाम मजुराची धारदार शस्त्राने हत्या, मृतदेह तिथेच फेकून दिला अन्.. पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड | Nagpur

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. त्यानंतर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही हत्या नेमकी कुणी केली? ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली? याचा तपास मुरबाड पोलीस करीत आहेत.

Crime
NEET परीक्षेआधीच विद्यार्थ्यानं आयुष्याचा दोर कापला, घरात गळफास घेऊन संपवलं आयुष्य, बीडमध्ये हळहळ

या घटनेमुळे जांबुर्डे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Crime
पुण्यात नवले ब्रिजवर भीषण अपघात, मर्सिडीजनं दुचाकीला उडवलं; घटनास्थळावरील फोटो पाहुन उडेल थरकाप | Pune Accident

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com