NEET Aspirant
NEET AspirantSaam

NEET परीक्षेआधीच विद्यार्थ्यानं आयुष्याचा दोर कापला, घरात गळफास घेऊन संपवलं आयुष्य, बीडमध्ये हळहळ

NEET Aspirant Killed himself in Latur: लातूरमध्ये NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने परीक्षेच्या एक दिवस आधीच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Published on

NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने परीक्षा होण्यापूर्वीच आपल्या आयुष्याचा दोर कापला आहे. लातूरमधील राहत्या खोलीतच त्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. मृत विद्यार्थी गेले अनेक वर्ष कोचिंग क्लासमध्ये NEET परिक्षेची तयारी करत होता. मागच्या वेळी त्याला ५२० गुण मिळाले होते. मात्र तरीही त्याला वैद्यकीय प्रवेश मिळाला नव्हता. यंदाही तो NEET परिक्षेची तयारी करत होता. पण परिक्षेच्या १ दिवस आधीच त्याने राहत्या खोलीत आत्महत्या केली. तरूणाने आत्महत्या का केली? याचा शोध पोलीस घेत आहेत.

अनिकेत अंकुश कानगुडे (वय वर्ष २०) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो मुळचा बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रूई धानोर गावातील रहिवासी होता. तो मागील २ वर्षांपासून लातूरमधील आरसीसी कोचिंग क्लासेसमध्ये NEET परिक्षेची करत होता. यंदाही तो NEET परिक्षेची तयारी करत होता.

NEET Aspirant
Royal Enfield Bullet १९८६ मध्ये किती रूपयांना होती? बिल पाहून धक्का बसेल | Viral

मागच्या परिक्षेत त्याला ५२० च्या जवळपास गुण मिळाले होते. मात्र, वैद्यकीय प्रवेश मिळालेला नव्हता. पुन्हा तो नीट परीक्षेची तयारी करत होता. पण परीक्षेच्या एक दिवस आधीच त्याने आपल्या आयुष्याची दोर कापली. अनिकेतने आपल्या राहत्या खोलीतच गळफास घेत आत्महत्या केली आहे. गळफास घेतल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. अनिकेतनं आत्महत्या का केली? आत्महत्या करण्यामागचं कारण काय? याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. या घटनेनंतर कुटुंब आणि परिसरातून शोक व्यक्त होत आहे.

NEET Aspirant
NSS कॅम्पमध्ये केवळ ४ मुस्लीम, पण प्राध्यापकानं १५९ विद्यार्थ्यांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रकरण काय? | Crime

NEET २०२५ परीक्षेची जय्यत तयारी

वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट २०२५ परीक्षा येत्या ४ मे रोजी देशभर आयोजित करण्यात आली आहे. देशभरातून सुमारे २३ लाख विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जाणार आहेत, तर लातूर जिल्ह्यातून तब्बल २०,८०९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

NEET Aspirant
Kolhapur: रेल्वे रूळावर झोपला अन् अंगावरून ट्रेन गेली, शिर धडापासून वेगळं अन्.. कोल्हापुरात तरूणाची आत्महत्या

ही परीक्षा राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत (NTA) घेतली जाणार असून, लातूर जिल्हा प्रशासनाने परीक्षेसाठी जय्यत तयारी केली आहे. जिल्ह्यातील ५१ परीक्षा केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांसाठी हेल्प डेस्कची स्थापना करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com