
रॉयल एन्फिल्ड बुलेट ३५० भारतातील सर्वात लोकप्रिय मोटरसायकलींपैकी एक आहे. गेल्या काही दशकांमध्ये या बाईकच्या डिझाइन आणि फीचर्समध्ये बदल झालेला असला तरी तिचा मूळ देखावा कायम राखला आहे. कंपनीने वेळोवेळी बाईकच्या फीचर्समध्ये बदल केले आहेत, ज्यामुळे बुलेटची लोकप्रियता अजूनही कायम आहे. सध्याच्या काळात रॉयल एन्फिल्ड बुलेट ३५०ची किंमत ₹2,17,000 पर्यंत पोहोचली आहे. पण १९८६ साली ही बाईक किती स्वस्त होती? हे आपल्याला ठाऊक आहे का?
१९८६ साली रॉयल एन्फिल्ड बुलेट ३५० कितीला मिळायची?
सोशल मीडियावर एक बिल व्हायरल होत आहे. या जुन्या बिलामध्ये १९८६ साली रॉयल एन्फिल्ड बुलेट ३५० ची किंमत लिहिलेली आहे. या जुन्या बिलानुसार, १९८६ साली रॉयल एन्फिल्ड बुलेट ३५० ची किंमत फक्त १८, ७०० इतकी होती. हे व्हायरल बिल २३ जानेवारी १९८६ रोजीचे असून, बोकारो (झारखंड) येथील डीलरचे नाव त्यात दिसत आहे. रॉयल एन्फिल्ड बुलेट ३५० वर डिस्काऊंट दिल्यानंतर १८,७०० ला विकण्यात आली आहे.
व्हायरल बिल आणि सध्याची किंमत
सध्याच्या काळात, रॉयल एन्फिल्ड बुलेट ३५० ची किंमत २ लाखांपासून सुरू होते. मात्र, १९८६ साली ही रॉयल एन्फिल्ड बुलेट ३५० केवळ १८,७०० रूपयांना विकली जात होती. १९८६ सालीचं रॉयल एन्फिल्ड बुलेट ३५०चं बिल सध्या इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे.
रॉयल एन्फिल्डचे नावाजलेले फीचर्स
रॉयल एन्फिल्ड बुलेट 350 मध्ये सध्या 13.5 लिटर इंधन टाकी असून, तिचा मायलेज 37.17 kmpl आहे. ही कंपनी सध्या विविध आणि नवीन मॉडेल्स आपल्या ग्राहकांसाठी लाँच करत आहे. याची क्रेझ लोकांमध्ये दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.