NSS कॅम्पमध्ये केवळ ४ मुस्लीम, पण प्राध्यापकानं १५९ विद्यार्थ्यांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रकरण काय? | Crime

Professor Accused of Forcing Non-Muslim Students to Perform Namaz: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असताना, छत्तीसगडमधील बिलासपूरमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
Muslim
MuslimSaam
Published On

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असताना, छत्तीसगडमधील बिलासपूरमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) कॅम्पदरम्यान बिगर मुस्लिम विद्यार्थ्यांना नमाज पठण करण्यास भाग पाडल्याच्या आरोपाखाली एका प्राध्यापकाला अटक करण्यात आली आहे. यापूर्वी या प्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती डीएसपी रश्मीत कौर चावला यांनी दिली आहे.

आरोपीचे नाव दिलीप झाल असून, तो गुरु घासीदास केंद्रीय विद्यापीठातील प्राध्यापक आहे. ३१ मार्च रोजी एनएसएस कॅम्पमधील १५९ विद्यार्थ्यांना नमाज पठण करण्यास भाग पाडल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवण्यात आली होती. या विद्यार्थ्यांपैकी केवळ चार विद्यार्थी मुस्लीम होते. हा कॅम्प २६ मार्च ते १ एप्रिल दरम्यान, कोटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवतराई गावात आयोजित करण्यात आला होता.

Muslim
Pahalgam Pakistan: कंगाल पाकिस्तानचं नसतं धाडस! भारतीय सीमेजवळ रणगाडे, फायरिंगचाही सराव; पायावर कुऱ्हाड मारून घेणार

विद्यार्थ्यांचा निषेध

कॅम्पमधून परतल्यानंतर विद्यार्थ्यांनी या घटनेचा निषेध केला. हिंदू संघटनांनी देखील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी तपास सुरू केला असून, बिलासपूरचे एसपी रजनीश सिंह यांच्या आदेशानुसार शहर अधीक्षक अक्षय सबादरा यांच्या नेतृत्वाखाली चार सदस्यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली. समितीच्या अहवालावरून दिलीप झाल आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Muslim
Crime: NEETच्या परीक्षेची तयारी अन् विद्यार्थीनीवर सामुहिक बलात्कार, अश्लील VIDEO काढला

कायदेशीर कारवाई

दिलीप झाल आणि एका विद्यार्थ्यावर भारतीय न्याय संहिता आणि छत्तीसगड धर्म स्वातंत्र्य कायद्यांतर्गत, धर्माच्या आधारावर द्वेष पसरवणे व धार्मिक भावना दुखावणे आदी आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com