Dr. Valsangkar: डॉ. वळसंगकर प्रकरणाचं गूढ वाढलं, सून आणि तिचे वडील परदेशात रवाना, नेमकं कारण काय?

Neurosurgeon Shirish Valsangkar case: न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येनंतर संपूर्ण सोलापुरात खळबळ उडाली आहे. तपासात आता एक नवा ट्विस्ट समोर आला असून, त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे.
Shirish Valsangkar
Shirish ValsangkarSaam Tv News
Published On

न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण सोलापुरात खळबळ उडाली आहे. आता डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्याप्रकरणाच्या तपासात एक वेगळा ट्वीस्ट समोर आला आहे. यामुळे या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे.

डॉ. वळसंगकर यांच्या सून डॉ. सोनाली वळसंगकर आणि तिचे वडील डॉ. दिलीप जोशी हे दोघेही अचानक बेपत्ता झाल्या आहेत. त्यांनी परदेश गाठले असून, याबाबत पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणात मनिषा माने या महिलेची चौकशी सुरू आहे. चौकशीत अनेक बाबी समोर आल्या. माने यांची चौकशी सुरू असताना, वळसंगकर यांच्या कुटुंबाची देखील चौकशी करण्यात आली होती. पण, अद्याप या प्रकरणाचा संपूर्ण तपास पूर्ण झालेला नाही. दरम्यान, तपास सुरू असताना वळसंगकर यांची सून तिच्या वडिलांसोबत परदेशात गेल्याची माहिती समोर आली आहे.

Shirish Valsangkar
12th HSC Result : अभिनंदन! बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींचीच बाजी

डॉ. शिरीष वळसंगकर यांचा मुलगा हा अमेरिकेत असतो. त्यामुळे त्यांची सून आपल्या वडिलांसोबत अमेरिकेला गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर, दुसरीकडे काहींचं म्हणणं आहे, की डॉ. सोनाली मुंबईत स्थायिक होणार आहे. त्यामुळे त्यांनी सोलापूर सोडल्याची माहिती समोर आली आहे. तर, काही हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, ३० मे नंतर पुन्हा ओपीडीमध्ये दिसतील.

Shirish Valsangkar
Pahalgam Attack : दहशतवाद्यांना मदत करणारा ठार, पोलिसांना गुंगारा देऊन नदीत उडी, पण शेवटी... VIDEO

या सर्व चर्चांमध्ये डॉ.शिरीष वळसंगकर यांच्या सून आणि तिचे वडील नेमके कुठे आहेत? याची माहिती कुणालाही नाही. तसेच पोलिसांकडूनही अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाचं गूढ अधिक वाढलं आहे.

Shirish Valsangkar
12th HSC Result: संतोष देशमुखांची लेक झाली पास! बारावीला मिळाले इतके गुण, कुटुंबियांचे डोळे डबडबले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com