12th HSC Result: वाह रं पठ्ठ्या! सांगलीच्या पोराला प्रत्येक विषयात ३५ गुण, मार्कशीट सोशल मीडियात व्हायरल

Hemant Kiranshatales Remarkable Result: राज्यातील यशस्वी मुलांचं कौतुक होत असताना सांगली जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याच्या निकालाची विशेष चर्चा होत आहे. त्याचा रिझल्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
Sangli 12th Result
Sangli 12th ResultSaam
Published On

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल ५ मे रोजी जाहीर केला. यंदा राज्याचा निकाल ९१.८८ टक्के लागला असून, मुलींनी निकालात मुलांना मागे टाकत बाजी मारली आहे. ९४.५८ टक्के बारावीतील मुली अव्वल गुणांनी उत्तीर्ण झाल्या असून, मुलांचा ८९.५१ टक्के निकाल लागलेला आहे. राज्यातील यशस्वी मुलांचं कौतुक होत असताना सांगली जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याच्या निकालाची विशेष चर्चा होत आहे.

Sangli 12th Result
Pune News: दारू वेळेवर न आणून दिल्याचा वाद विकोपाला, काका- पुतण्यानं एकाला जागीच संपवलं; पुण्यात खळबळ

हेमंत किरण सटाले असे विद्यार्थ्याचे नाव आहे. तो आटापाडी तालुक्यातील कौठुळी गावातील रहिवासी आहे. त्याचा नुकताच बारावीचा निकाल लागला. हेमंतला बारावीत प्रत्येक विषयात ३५ गुण मिळाले आहेत.

Sangli 12th Result
Beed News: बीडचं बिहार झालं! पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानीच गांजा फुकला, सुरक्षा रक्षकाने पाहताच..

एवढंच नाही तर, त्याला ३५ टक्केच मिळाले आहेत. हेमंत हा व्यावसायिक अभ्यासक्रमातील टेक्नोलॉजी विभागातील विद्यार्थी आहे. त्याने बारावीचं शिक्षण इंद्रभाग्य पद्मिनी कॉलेजमधून पूर्ण केलं आहे.

त्याने घेतलेल्या कोर्समध्ये मराठी, इंग्रजी, इंजिनअरिंग ड्रॉइंग, वर्कशॉप, सायन्स अँड कॅल्क्युलेशन, ट्रेड थिअरी, एम्प्लॉयबिलिटी स्किल्स या विषयांचा समावेश होता. त्याला प्रत्येक विषयात पासिंग ३५ गुण मिळाले असून, ३५ टक्केच मिळाले आहेत. सोशल मीडियावर लोक हेमंतला “पासिंग स्टार” म्हणत शुभेच्छा देत आहेत. सध्या त्याची मार्कशीट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Sangli 12th Result
Mock Drill: उठा अन् सज्ज व्हा! मुंबई, ठाणे, पुणे; राज्यात १६ ठिकाणी होणार मॉक ड्रिल, पाहा यादी..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com