PAK Anchor: लाईव्ह बुलेटीनमध्ये पाकिस्तानी अँकर ढसाढसा रडली, अल्लाहकडे केली प्रार्थना; नेटकरी म्हणाले 'मगरमच्छ के आंसू'

Indias Airstrike on Pakistan: भारताकडून झालेल्या एअर स्ट्राईकची बातमी देताना पाकिस्तानी मीडियामधील एका अँकरला अश्रु अनावर झाल्या आहेत. पाकिस्तानी न्यूज अँकर लाईव्ह बुलेटीन करत असताना ढसाढसा रडली होती.
Operation Sindoor
Operation SindoorSaam
Published On

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं आहे. पाकिस्तानच्या ९ दहशतवाद्यांचे तळ एअर स्ट्राईक करून उद्धवस्त केले आहेत.

दरम्यान, भारताकडून झालेल्या एअर स्ट्राईकची बातमी देताना पाकिस्तानी मीडियामधील एका अँकरला अश्रु अनावर झाल्या आहेत. पाकिस्तानी न्यूज अँकर लाईव्ह बुलेटीन करत असताना ढसाढसा रडली होती.

सोशल मीडियावर एका पाकिस्तानी अँकरचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय हवाई हल्ल्यानंतर झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच ती लाईव्ह बुलेटीनमध्ये ढसा ढसा रडली आहे. दबलेल्या आवाजात ती हल्ल्यात मृत पावलेल्या लोकांसाठी अल्लाहकडे प्रार्थना करताना दिसून येत आहे.

Operation Sindoor
Naxalite Encounter: ऑपरेशन सिंदूरनंतर सुरक्षा दलाकडून मोठी कारवाई, करेगुट्टामध्ये २२ नक्षलवाद्यांचा खात्मा

मात्र, नक्की कोणत्या अधिकृत वृत्तवाहिनीशी संबंधित आहे, याची माहिती समोर आलेली नाही. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. भारतीय नेटकऱ्यांनी या व्हिडिओवरील महिला अँकरची खिल्ली उडवली आहे. तसेच नेटकऱ्यांनी मोठ्या पाकिस्तानवर टीका केली आहे.

Operation Sindoor
ऑपरेशन सिंदूर कसं राबवलं? पाकिस्तानच्या नांग्या कशा ठेचल्या? अभ्यासकांनी दिली इत्यंभूत माहिती | Operation Sindoor

ऑपरेशन सिंदूर

२२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. या हल्ल्यात पाकिस्तानचे ९ दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त झाले. या हल्ल्यानंतर पाकिस्ताना बिथरला. पाकिस्तानी सैन्यांनी देखील नियंत्रण रेषेवर हल्ला करत भारतीय सीआरपीएफ जवानाच्या तुकडीवर बॉम्ब हल्ला केला. सध्या हे युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Operation Sindoor
IND v/s PAK: "अभी पिक्चर बाकी है…"; Operation Sindoor नंतर भारत आणखी एक ऑपरेशन राबवणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com