IND v/s PAK: "अभी पिक्चर बाकी है…"; Operation Sindoor नंतर भारत आणखी एक ऑपरेशन राबवणार?
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. अशातच भारताचे माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी सूचक ट्विट केलं आहे. ज्यामुळे चर्चेला अधिक उधाण आलं आहे. "अभी पिक्चर बाकी है…" असं माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी ट्विट केलं आहे. नरवणे यांनी हे ट्विट केल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत आणखी एखादं मोठं ऑपरेशन राबवणार का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने मध्यरात्री पाकिस्तानच्या ९ दशतावादी अड्ड्यांवर एअर स्ट्राईक केला. ऑपरेशन सिंदूर राबवत भारताने पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या. ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर पाकिस्तानमधील अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. आता माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. या ट्विटमुळे भारत आणखी एक ऑपरेशन राबवणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी ट्विटरवर "अभी पिक्चर बाकी है…" असं ट्विट केलं आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमुळे भारतीयांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे.
लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे हे भारतीय लष्कराचे २८ वे प्रमुख होते. ३१ डिसेंबर २०१९ रोजी त्यांनी लष्करप्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यापूर्वी नरवणे यांच्याकडे लष्कराच्या पूर्व मुख्यालयाची जबाबदारी होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.