IPL 2025 मध्येच थांबवल्यास कोण होणार चॅम्पियन? RCB चं १८ वर्षांपासूनचं स्वप्न पूर्ण होऊ शकेल का?

IPL 2025 News : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याचा परिणाम आयपीएल २०२५ वर झाला आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे आयपीएल एका आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.
IPL 2025 News
IPL 2025 NewsX
Published On

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात २६ पेक्षा जास्त निष्पाप नागरिकांचा बळी गेला. या हल्ल्यांला भारताने ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले. भारताने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी ठाणी उद्ध्वस्त केली. या कारवाई १०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले. ऑपरेशन सिंदूरमुळे चवताळलेल्या पाकिस्तातने काल (८ मे) भारताच्या सीमावर्ती भागावर ड्रोन, मिसाईल्सने हल्ला केला. या हल्ल्याला भारतीय सैन्याने वेळीच प्रत्युत्तर दिले. युद्धजन्य परिस्थितीमुळे धरमशाला येथे सुरु असलेला पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना सुरक्षेच्या कारणास्तव थांबवण्यात आला.

भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध आणखी ताणले गेले आहे. देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आयपीएल २०२५ एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आले आहे. 'सध्याच्या परिस्थितीमुळे आयपीएल आठवड्याभरासाठी स्थगित करण्यात आले आहे. चर्चा-सल्लामसलत केल्यानंतर स्पर्धेचे नवीन वेळापत्रक जाहीर केले जाईल. आम्हाला भारतीय सैन्याचा अभिमान आहे. बीसीसीआय देशातील सशस्त्र दलांच्या आणि सरकारच्या पाठीशी आहे', असे वक्तव्य बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी केले आहे.

IPL 2025 News
Operation Sindoor : ५ पाकड्यांना संपवलं, शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला; घाटकोपरचे मुरली नाईक शहीद

बीसीसीआय चर्चा करुन आयपीएल विषयी निर्णय घेतील. पण जर एका आठवड्यानंतरही परिस्थितीमध्ये सुधारणा झाली नाही, तर आयपीएल २०२५ मधील उरलेले सामने सप्टेंबरमध्ये खेळवले जाऊ शकतील असा अंदाज वर्तवला जात आहे. दुसऱ्या देशात सामने खेळवणे हा देखील पर्याय आहे. सुरक्षेच्या हेतूने बीसीसीआय योग्य तो निर्णय घेईल असे म्हटले जात आहे. त्यांनी जर आयपीएल २०२५ थांबवण्याचा निर्णय घेतला तर विजेतेपद कोणाकडे जाईल?

IPL 2025 News
घाबरून, गोंधळून जाऊ नका! देशात पुरेसा पेट्रोल-डीझेल साठा; पंपांवरील गर्दीनंतर इंडियन ऑइलचं स्पष्टीकरण

चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद हे तीन संघ प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. याशिवाय कोलकाता आणि लखनऊ या संघांची प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता कमी आहे. तेव्हा गुजरात, बंगळुरु, पंजाब, मुंबई आणि दिल्ली प्लेऑफच्या स्पर्धेत आहेत. पॉईंट्स टेबलवर गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ११ सामन्यांसह १६ गुणांसह आघाडीवर आहेत. पण नेट रन रेटमुळे गुजरात बंगळुरूच्या पुढे आहे. जर आयपीएल २०२५ स्पर्धा झालीच नाही, तर पॉईंट्स टेबलवर टॉपचा संघ म्हणून गुजरातकडे आयपीएल २०२५ चे विजेतेपद जाईल असा अंदाज वर्तवला जात आहे.

IPL 2025 News
Dawood Ibrahim : भारताचं ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानात; बिळात लपलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद भेकडासारखा पळाला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com