IPL 2025
IPL 2025 : आयपीएलच्या १८ व्या हंगामाचा थरार २२ मार्चपासून सुरू होणार आहे. १० संघामध्ये ७४ सामने होणार आहेत.यंदाच्या हंगामातील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात ईडन गार्डन्सवर होणार आहे. दोन महिन्यांहून अधिक काळ आयपीएलची धमाल जगभरातील टी२० क्रिक्रेटप्रेमींना अनुभवायला मिळणार आहे.
आयपीएलच्या (IPL 2025) १८ व्या हंगामात दहा संघामध्ये एकूण ७४ सामने खेळले जाणार आहेत. ही स्पर्धा भारतातील 13 शहरांमध्ये आयोजित केली जाईल. २५ मे रोजी आयपीएलचा अंतिम सामना कोलकात्यात खेळवला जाणार आहे. क्वालीफायर 1 आणि एलिमिनेटर सामन्याची मेजबानी हैदराबाद करणार आहे.
मुंबई इंडियन्स, चेन्नई, आरसीबी, कोलकाता, पंजाब, हैदराबाद, गुजरात, लखनौ, दिल्ली,राजस्थान या दहा संघामध्ये अटीतटीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. हार्दिक पांडया, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, विराट, कोहली, रोहित शर्मा, एमएस धोनी, केएल राहुल यासारखे दिग्गज खेळताना दिसणार आहेत.