Rohit Sharma Joining KKR Team In IPL
Rohit Sharma google

Rohit Sharma: रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडून KKR मध्ये जाणार का? सोशल मीडिया पोस्टमुळे उडाली खळबळ

Rohit Sharma Joining KKR Team In IPL: व्हायरल सोशल मीडिया पोस्टनंतर रोहित शर्मा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाला सोडून कोलकाता नाइट रायडर्स संघातून खेळणार आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे.
Published on

आयपीएल २०२६ साठी फ्रँचायझींनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. रणनीतीसोबतच, खेळाडूंच्या ट्रेडवरही टीम मॅनेजमेंटचे लक्ष आहे. मिनी लिलावापूर्वीच फ्रँचायझी काही प्रमुख खेळाडूंना साइन करण्याचा विचार करत आहेत. यातच, कोलकाता नाईट रायडर्सने अभिषेक नायरला मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले.

यादरम्यान, कोलकाता नाइट रायडर्सने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. ज्यामुळे स्टार फलंदाज रोहित शर्मा केकेआरमध्ये सामील होण्याची चर्चा सुरु झाली. रोहित शर्मा आणि अभिषेक नायर खूप चांगले मित्र असल्याने रोहित मुंबई इंडियन्सला रामराम करत केकेआर संघाचा भाग होणार अशा बातम्यांनी जोर धरला आहे. यावर, मुंबई इंडियन्सने देखील एक पोस्ट करत स्पष्टीकरण दिले आहे.

मुंबई इंडियन्सची सोशल मीडिया पोस्ट

मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर रोहित शर्माचा फोटो शेअर करत एक गूढ पोस्ट केली. यामुळे चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली. "उद्या पुन्हा सूर्य उगवेल, हे नक्की, पण (K)night 'नाईट.... ते फक्त कठीणच नाही तर अशक्यही आहे!" 'नाईट' चे स्पेलिंग. 'n' ने सुरू होते. पण मुंबईने कंसात 'k' लिहिले आहे. हे कोलकाता नाईट रायडर्समधील 'नाईट' साठी वापरण्यात आले आहे. मुंबईची ही पोस्ट कोलकाता नाइट रायडर्ससाठी टोमणा असल्याचे म्हटले जात आहे.

रोहित शर्मा केकेआरमध्ये सामील होणार का?

रोहित शर्मा आयसीसी वनडे रॅंकिंगमध्ये अव्वल आल्यानंतर कोलकाताने रोहितचे अभिनंदन केले आणि एक पोस्ट शेअर केली. पोस्टमध्ये लिहिले की, 'तू जगात अव्वल आहेस आणि तू याला पात्र आहेस, अभिनंदन, रोहित... '. यानंतर एका युजरने कमेंट केले की, मग मी याला निश्चित समजू? त्यानंतर केकेआरने या चाहत्याला मजेशीर पद्धतीने उत्तर दिले की, 'नंबर १ वनडे फलंदाज झाला हे निश्चित आहे.'

Kolkata Knight rider Post
Rohit Sharma x

यानंतर एक फॅनने लिहिले की, 'म्हणजेच हिटमॅन केकेआरमध्ये आला आहे..' कमेंट सेक्शनमधील हे संभाषण सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. या संभाषणामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये खळबळ उडाली. लोकांनी याला मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज रोहित शर्मा केकेआरमध्ये सामील होणार असल्याचे संकेत समजले. परंतु, रोहित, केकेआर किंवा मुंबई इंडियन्स या कोणाकडूनही अद्याप याबाबत कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.

Rohit Sharma Joining KKR Team In IPL
Ind vs Aus Semi Final: ऑस्ट्रेलियाचा तडाखा, ३३९ धावांचं टार्गेट; भारत फायनल गाठणार का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com