Ind vs Aus Semi Final: ऑस्ट्रेलियाचा तडाखा, ३३९ धावांचं टार्गेट; भारत फायनल गाठणार का?

Ind Vs Aus World Cup Semifinal First Inning: आयसीसी महिला वनडे वर्ल्डकपमधील दुसरा सेमीफायनल सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत भारताला इतक्या धावांचे लक्ष्य दिले आहे.
Ind Vs Aus World Cup Semifinal First Inning
Ind vs Aus Semi Final google
Published On

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला वनडे वर्ल्डकपमधील दुसरा सेमीफायनल सामना खेळला जात आहे. हा सामना नवी मुंबई येथील डी. वाय पाटील स्टेडियम येथे सुरु आहे. ऑस्ट्रेलियन संघाची कर्णधार अॅलिसा हिलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लिचफिल्डचे शतक आणि पेरी, गार्डनरच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाने ३३८ धावा केल्या आणि भारतासमोर ३३९ धावांचे लक्ष्य ठेवले.

ऑस्ट्रेलियाची दमदार फलंदाजी

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीसाठी आलेली कर्णधार अॅलिसा हीली फक्त ५ धावांवर बाद झाली. तर लिचफिल्ड आणि एलिस पेरी यांनी शतकीय भागीदारी केली. लिचफिल्डने आक्रमक फलंदाजी करत ७७ चेंडूत धमाकेदार शतक ठोकले. अखेर २८ व्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करताना अमनजोत कौरने लिचफिल्डला बोल्ड करत पव्हेलियनचा रस्ता दाखवला. लिचफिल्डने ९३ चेंडूत १७ चौकार आणि ३ षटकार मारत ११९ धावा केल्या. श्री चरणीने बेथ मुनीला २४ धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिला.

श्रीचरणीने ३६ व्या ओव्हरमध्ये सदरलँडला बाद करून भारताला आणखी एक यश मिळवून दिले. राधाने ४० व्या ओव्हरमध्ये एलिस पेरीला ७७ धावांवर बाद करत महत्वपूर्ण विकेट घेतला. त्यानंतर ४३ व्या ओव्हरमध्ये मॅकग्राथ धावबाद झाली. तर अॅशले गार्डनरने दमदार खेळी खेळत अर्धशतक ठोकले. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ ४९.५ ओव्हरमध्ये ३३८ धावांवर गारद झाला.

Ind Vs Aus World Cup Semifinal First Inning
Shreyas Iyer: श्रेयसची प्रकृती कशी आहे? अय्यरने स्वत: दुखापतीवर दिली मोठी अपडेट, काय म्हणाला?

दोन्ही संघामध्ये झाले मोठे बदल

या सामन्यासाठी भारतीय संघात तीन बदल करण्यात आले आहेत. क्रांती गौड, रिचा घोष आणि शेफाली वर्मा यांचा प्लेइंग ११ मध्ये समावेश करण्यात आला आहे. प्रतीका दुखापतीमुळे उपलब्ध नव्हती. हरलीन देओल आणि उमा छेत्री यांना विश्रांती देण्यात आली आहे. जॉर्जिया वेअरहॅमच्या जागी लेग-ब्रेक गोलंदाज सोफी मोलिनोला ऑस्ट्रेलिया संघात स्थान देण्यात आले आहे. अॅलिसा हीलीचेही संघात कमबॅक झाले.

भारतीय संघ: शेफाली वर्मा, स्मृती मानधना, अमनजोत कौर, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकिपर), राधा यादव, क्रांती गौड, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर.

ऑस्ट्रेलिया संघ: फोबी लिचफिल्ड, अलिसा हिली (विकेटकिपर/कर्णधार), ॲलिसा पेरी, बेथ मूनी, ॲनाबेल सदरलँड, ॲशले गार्डनर, ताहलिया मॅकग्राथ, सोफी मोल्निक्स, अलाना किंग, किम गर्थ, मेगन शूट.

Ind Vs Aus World Cup Semifinal First Inning
Chris Broad On BCCI: मला एक फोन आला अन्...ICC च्या मॅच रेफरीचे बीसीसीआयवर गंभीर आरोप, सौरव गांगुलीही वादाच्या भोवऱ्यात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com