
आयपीएलमधून प्रसिद्धी मिळवलेला भारतीय क्रिकेटपटू यश दयाल सध्या गंभीर वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील एका तरुणीने त्याच्यावर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणी यश दयालविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी आता आणखी एका प्रकरणामुळे त्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील एका तरूणीनं यश दयालवर गंभीर आरोप केले होते. यशनं आधी लग्नाची भूलथाप दिली, नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, असा आरोप तरूणीकडून करण्यात आला होता. या प्रकरणात अलहाबाद उच्च न्यायालयाकडून त्याला दिलासा मिळाला होता. मात्र, आता आणखी एका प्रकरणामुळे त्याच्या अडचणीत वाढ होणार आहे. कारण जयपूरमधील एका तरूणीनं यश दयालवर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.
जयपूरमधील एका १७ वर्षांच्या तरुणीने यश दयालवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली आहे. सांगानेर सदर पोलीस ठाण्यात तिने एफआयआर दाखल केली आहे. यश दयालने क्रिकेटमध्ये करिअर घडवण्याची भूलथाप देत तिला जाळ्यात ओढलं. नंतर भावनिक दबाव टाकून जवळपास दोन वर्षं तिचं शोषण केलं, असा तिचा आरोप आहे.
तिने एफआयआरमध्ये नमूद केलं आहे की, आयपीएल २०२५ दरम्यान जेव्हा यश जयपूरला आला, तेव्हा त्याने तिला सीतापुरा येथील एका हॉटेलमध्ये बोलावलं आणि अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडितेने २३ जुलै रोजी तक्रार नोंदवली होती.
पीडित तरूणीनं तक्रारीत नेमकं काय म्हटलं आहे?
उत्तर प्रदेशातील तरूणीनं तक्रारीत म्हटलं की, मी गेल्या पाच वर्षांपासून यशसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्याने मला लग्नाचे वचन दिले आणि पतीसारखे वागत राहिला. मी त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला. मात्र जेव्हा मला फसवणूक असल्याची जाणीव झाली आणि मी विरोध केला, तेव्हा त्याने माझ्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार केला, असं तिनं म्हटलं आहे.
तसेच, या प्रकरणाची कायदेशीर पद्धतीनं चौकशी करण्यात यावी, निष्पक्षपणे चौकशी व्हावी. हे पाऊल फक्त तिच्यासाठी नसून, संबंधित पीडित तरूणींसाठी महत्वाचे आहे, असं पीडित तरूणी म्हणाली. दरम्यान, तरूणीनं केलेल्या आरोपानंतर क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.