Ind Pak Tension : महेंद्रसिंह धोनी देशासाठी सीमेवर लढाई करण्यासाठी जावे लागणार? कारण...

India Pakistan Tension : भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाने भारतीय सैन्याला 'प्रादेशिक सैन्य म्हणजेच टेरिटोरियल आर्मी' बोलावण्याची परवानगी दिली आहे.
MS Dhoni
MS DhoniX
Published On

भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील संबंध पहलगाम हल्ल्यानंतर ताणले गेले आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतावर हल्ला केला. हे हल्ले भारताने हाणून पाडले. युद्धजन्य परिस्थितीमध्ये संरक्षण मंत्रालयाद्वारे एक आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार, भारतीय सैन्याला प्रादेशिक सैन्य म्हणजेच टेरिटोरियल आर्मी बोलावण्याची परवानगी देण्यात आली आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी टेरिटोरियल आर्मीचा भाग आहे. धोनीला टेरिटोरियल आर्मीमधील मानद लेफ्टनंट कर्नल हे पद मिळाले आहे. युद्धजन्य परिस्थितीदरम्यान जर तणाव वाढला आणि भारतीय सैन्याने टेरिटोरियल आर्मीला बोलावले, तर महेंद्रसिंह धोनीला देखील सीमेवर लढाई करायला जावे लागू शकते.

MS Dhoni
Viral Video : हीच खरी देशभक्ती! डीसींचे एक आवाहन अन् अनेक तरूणांनी धरली भरतीची वाट, म्हणाले- सैन्याला पाठिंबा देण्यासाठी...

टेरिटोरियल आर्मी म्हणजे काय?

जे लोक इतर व्यवसाय, नोकरी करतात, पण भारतीय सैन्यात सेवा देऊ इच्छितात, असे नागरिक टेरिटोरियल आर्मीमध्ये सामील होऊ शकतात. महेंद्रसिंह धोनी हा क्रिकेट खेळतो, गावी शेती करतो, त्याचसोबत तो टेरिटोरियल आर्मीचा देखील भाग आहे. सचिन तेंडुलकरला देखील टेरिटोरियल आर्मीमध्ये ग्रुप कॅप्टन ही पदवी मिळाली आहे. एमएस धोनी, सचिन तेंडुलकर प्रमाणे भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे देखील या आर्मीचे सदस्य आहेत.

MS Dhoni
Operation Sindoor : ५ पाकड्यांना संपवलं, शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला; घाटकोपरचे मुरली नाईक शहीद

टेरिटोरियल आर्मी हे राखील सैन्य दल असते, या आर्मीतील जवानांना सैन्याकडून प्रशिक्षण देखील मिळते. जेव्हा देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते किंवा युद्धाला सुरुवात होते, तेव्हा टेरिटोरियल आर्मीला बोलावले जाते. सीमेवर भारतीय लष्कराला सहकार्य करण्यासह देशांतर्गत सुरक्षा प्रदान करणे हे देखील टेरिटोरियल आर्मीचे काम आहे.

MS Dhoni
मोठी बातमी! मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता, हायअलर्ट जारी; मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com