Viral Video : हीच खरी देशभक्ती! डीसींचे एक आवाहन अन् अनेक तरूणांनी धरली भरतीची वाट, म्हणाले- सैन्याला पाठिंबा देण्यासाठी...

India Pakistan Tension : भारत-पाकिस्तान यांच्यामधील तणाव वाढल्याने चंदीगडमधील तरुणांना नागरी संरक्षण स्वयंसेवक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. शिबिरात सहभागी होण्यासाठी तरुणांनी मोठी गर्दी केली.
viral video
viral videoPTI
Published On

भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर चंदीगड प्रशासनाने नागरी संरक्षण स्वयंसेवक म्हणून सामील होण्यासाठी तरुणांना आवाहन केले होते. संरक्षण नोंदणी आणि प्रशिक्षण शिबिरांमध्ये सहभागी होण्यासाठी तरुणांनी मोठी गर्दी केली. टागोर थिएटरमध्ये तरुणांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. अनेक तरुणांनी नागरी संरक्षण स्वयंसेवक होण्यासाठी छावणीत प्रवेश केला. तरुणांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये तरुणांईचा उत्साह पाहायला मिळत आहे.

viral video
Fact Check : पाकिस्तानने भारताची S-400 सुदर्शन चक्र सुरक्षा प्रणाली नष्ट केली? व्हायरल मेसेजमागचं सत्य जाणून घ्या...

चंदीगडच्या सेक्टर-१८ येथील टागोर थिएटरमध्ये नागरी संरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी इतकी गर्दी झाली की अनेकांना सेक्टर १७ मधील तिरंगा पार्कमध्ये पाठवण्यात आले. उत्साही तरुणांनी थिएटरमधून पार्ककडे कूच करताना भारत माता की जय अशी घोषणा दिल्या. चंदीगडमधील शिबिराचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

viral video
मोठी बातमी! मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता, हायअलर्ट जारी; मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द

चंदीगडचे उपायुक्त तथा जिल्हाधिकारी निशांत कुमार यादव यांनी शुक्रवारी (९ मे) स्थानिक तरुणांना नागरी संरक्षण नोंदणी आणि प्रशिक्षण शिबिरात सहभागी होऊन स्वयंसेवक बनण्याचे आवाहन केले होते. यावरुन १८ वर्षांवरील तरुणांनी आज (१० मे) चंदीगडच्या टागोर थिएटर येथे मोठी गर्दी केली. प्रशिक्षणानंतर या तरुणांना कर्तव्यावर तैनात केले जाणार आहे.

viral video
Operation Sindoor : ५ पाकड्यांना संपवलं, शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला; घाटकोपरचे मुरली नाईक शहीद

भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत आहे. पाकिस्तानकडून सीमेलगतच्या भागांवर हल्ले केले जात आहेत. पंजाबमधील काही भागांवर पाकिस्तानने ड्रोन, मिसाइल हल्ले करण्याचा प्रयत्न केला आहे. अशात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून चंदीगडमधील तरुणांना नागरी संरक्षण स्वयंसेवक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

viral video
Dawood Ibrahim : भारताचं ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानात; बिळात लपलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद भेकडासारखा पळाला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com