Good News: मोठी बातमी! बाळ जन्माला येताच मिळणार सोन्याची अंगठी, या राज्य सरकारचा मोठा निर्णय

Tamil Nadu Gold Ring Scheme: तामिळनाडूतील थलापती विजय सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत जन्मलेल्या बाळाला सोन्याची अंगठी दिला जाणार आहे.
Tamil Nadu Government
Tamil Nadu Gold Ring SchemeSaam Tv
Published On: 
  • तामिळनाडू सरकार नवजात बाळांना १ ग्रॅम सोन्याची अंगठी देत आहे

  • सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या बाळांना मिळणार सोन्याची अंगठी

  • २२ कॅरेट सोन्याची अंगठी दिला जाणार

  • तामिळनाडू गोल्ड रिंग योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी

Tamil Nadu Government: तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलापती विजयने अखेर आपले वचन पूर्ण केले. तामिळनाडू सरकारने सोमवारी आपली बहुचर्चित गोल्ड गिफ्ट असलेली स्कीम सुरू केली. या योजनेअंतर्गत राज्यातील सरकारी रुग्णालयात जन्माला आलेल्या नवजात बालकांना २२ कॅरेटची १ ग्रॅम सोन्याची अंगठी दिली जाणार आहे. ही योजना थलापती विजय सरकारच्या 'वेट्री तमिलगम' व्हिजनचा एक भाग असणार आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये जन्मलेल्या बालकांच्या जन्माचा उत्सव साजरा करणे हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे.

मुख्यमंत्री थलापती विजय यांनी सुरू केलेल्या या योजनेचे नाव देखील खूपच खास आहे. याला तैमान थंगा मोतिरम थिट्टम असं म्हणतात. याचा अर्थ काकांची सोन्याची अंगठी असा होतो. विजयने सोमवारी मदुराईमध्ये या योजनेचा शुभारंभ केला. त्यांनी मुदराईच्या शासकीय राजाजी रुग्णालयाच्या सभागृहात २५ नवजात बालकांना सोन्याच्या अंगठ्या दिल्या.

Tamil Nadu Government
Good News: ST प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, घरबसल्या NCMC कार्ड रिचार्ज करता येणार; कसं ते वाचा...

विजय थलपती यांनी वचन दिल्याप्रमाणे पूर्ण केले आहे. त्यांनी दिलेल्या वचनाप्रमाणे, राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये जन्मलेल्या पात्र बाळांना २२ कॅरेटच्या १ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी मिळेल. प्रत्येक अंगठीला एक विशिष्ट अनुक्रमांक असेल. ती सुरक्षित आणि पॅकेजिंग करून दिली जाईल. राज्य सरकारने या योजनेच्या शुभारंभासाठी १.२८ लाख सोन्याच्या अंगठ्या खरेदी केल्या आहेत. तसंच, या योजनेच्या अंमलबजावणीसाठी ७५५.८३ कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूदही केली आहे.

Tamil Nadu Government
Good News: 7 तासांत पुण्यावरून बीडला पोहचा, नवीन ट्रेन सुरू; तिकीट किती अन् थांबे कुठे?

पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. नवजात बाळाची आई तमिळनाडूची कायमची रहिवासी असणे आवश्यक आहे. आईची नोंदणी प्रेग्नन्सी अँड इन्फंट कोहोर्ट मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन अंतर्गत झालेली असावी. त्या महिलेकडे 'रिप्रॉडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ' ओळखपत्र असणेही आवश्यक आहे. ही योजना २२ जून २०२६ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या सर्व पात्र नवजात बालकांना लागू होईल. योजनेच्या अधिकृत शुभारंभानंतर, पात्र बालकांना रुग्णालयातून घरी सोडताना ही सोन्याची अंगठी दिली जाईल.

Tamil Nadu Government
Good News: पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! ऑक्टोबरमध्ये मिळणार ५ महिन्यांच्या पेन्शनची थकबाकी; एकाचवेळी किती पैसे मिळणार?

अहवालानुसार, २२ जून ते योजनेच्या प्रारंभाच्या तारखेपर्यंत जन्मलेल्या बालकांना सोन्याची अंगठी मिळावी यासाठी १०७ केंद्रे तयार करण्यात आली आहेत. २८ सप्टेंबरपासून प्रत्येक केंद्रामार्फत दररोज १०० मुलांना सोन्याच्या अंगठ्यांचे वाटप केले जाईल. ही योजना राज्यव्यापी राबवली जाणार आहे. ६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकांमुळे लागू केलेल्या निवडणूक आचारसंहितेमुळे ही योजना सध्या मदुरंतकम आणि धारापुरम येथे सुरू केली जात नाही. पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर तिथे देखील ही योजना सुरू केली जाईल.

Tamil Nadu Government
Good News: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, २५ सप्टेंबरला मिळणार पगार; सरकारचा मोठा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com