

पुणे ते बीड प्रवास सुसाट झाला आहे
पुण्यावरून बीडला अवघ्या ७ तासांत पोहचता येणार आहे
पुणे बीड नवीन ट्रेनचे वेळापत्रक जाहीर
पुणे बीड ट्रेन कोणत्या स्थानकांवर थांबणार
पुणे बीड एक्स्प्रेस ७ रेल्वे स्थानकावर थांबणार
पुणे- बीड प्रवास सुसाट झाला आहे. आजपासून पुणे-बीड रेल्वेसेवा सुरू झाली. मध्य रेल्वेने बीड आणि पुण्यादरम्यान पहिली दैनंदिन रेल्वेसेवा सुरू केली. बीड ते पुणेदरम्यान धावणारी बीड-पुणे विशेष गाडी (गाडी क्र. 11433/11434) आजपासून सुरू झाली. अनेक दशकांच्या प्रतीक्षेनंतर पुणे- अहिल्यानगर- बीड रेल्वे कनेक्टिव्हिटीला मोठं बळ मिळालं आहे. या रेल्वेसेवेमुळे पुणे, पिंपरी-चिंचवड, अहिल्यानगर आणि बीड या भागातील नागरिकांचा प्रवास अधिक सुखकारक आणि सुसाट होणार आहे. पुण्यावरून बीडला अवघ्या 7 तासांत पोहचता येणार आहे.
पुणे आणि बीडदरम्यान प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना आता कमी वेळात बीड आणि पुणे असा प्रवास करता येणार आहे. ही ट्रेन अहिल्यानगर मार्गे धावणार आहे त्यामुळे या भागातील नागरिकांना देखील त्यांचा फायदा होणार आहे. या नव्या रेल्वे सेवेमुळे विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक आणि सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. पुणे-बीड मार्गावरील हा महत्त्वाचा टप्पा प्रादेशिक विकासाला चालना देणारा ठरेल.
पुणे -बीड रेल्वे किती तासांत पोहचणार याची माहिती देखील समोर आली आहे. पुण्यावरून बीड हा प्रवास 7 तास 15 मिनिटांचा असेल. तर बीडवरून पुणे हा प्रवास 7 तास 50 मिनिटांचा असेल. महत्वाचे म्हणजे पुण्यावरून बीड आणि बीडवरून पुण्याला धावणाऱ्या या ट्रेन दररोज धावणार आहेत. १५ डब्यांची ही ट्रेन असणार आहे. या ट्रेनमुळे बीड ते पुणे अंतर कमी होईल आणि दोन्ही शहरं आणखी जवळ येतील. बीड ते पुणे धावणाऱ्या ट्रेनला अमळनेर भांड्याचे, नवीन आष्टी, नारायणडोह, अहिल्यानगर, श्रीगोंदा रोड, दौंड कॉर्ड लाईन आणि उरुळी या ७ स्थानकांवर थांबा असणार आहे.
- पुणे - रात्री 10:45 वाजता सुटेल
- उरुळी: रात्री 11:09–11:10
- दौंड चॉर्ड लाईन: मध्यरात्री 12:13–12:15
- श्रीगोंदा रोड: मध्यरात्री 12:38–12:40
- अहिल्यानगर: मध्यरात्री 1:30–1:40
- नारायणडोहो: मध्यरात्री 1:58–2:00
- नवी आष्टी: मध्यरात्री 3:03–3:05
- आमळनेर भांड्याचे: मध्यरात्री 3:33–3:35
- बीड : सकाळी 6:00 वाजता पोहचेल
- बीड : रात्री 9:30 वाजता सुटेल
- आमळनेर भांड्याचे: रात्री 10:38–10:40
- नवी आष्टी: रात्री 11:03–11:05
- नारायणडोहो: मध्यरात्री 12:23–12:25
- अहिल्यानगर: मध्यरात्री 12:55–1:05
- श्रीगोंदा रोड: मध्यरात्री 1:58–2:00
- दौंड चॉर्ड लाईन: मध्यरात्री 2:58–3:00
- उरुळी: मध्यरात्री 3:44–3:45
- पुणे पोहोचणे: पहाटे 5:20 वाजता पोहचेल
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.