

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी अपडेट
रितेश हांगे नावाच्या तरुणाला अटक
रितेश हांगे हा चेतन चौधरी याचा मित्र
पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला नवं वळण आलंय. या हत्या प्रकरणात एका नवीन व्यक्तीचा संबंध समोर आला आहे. पोलिसांनी केतन अग्रवाल हत्येप्रकरणी तिसऱ्या आरोपीला अटक केली आहे. सिया आणि चेतनसह त्याला सह-आरोपी करण्यात आलंय. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन आरोपीची ओळख चेतन चौधरीचा वर्गमित्र 'रितेश हिंगे' अशी पटली आहे.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, १८ जून रोजी लोहागड किल्ल्यावर केतन अग्रवालची हत्या करण्यात आली होती. हत्याकांडाचा माहिती रितेशला होती. चेतन चौधरी आणि त्याची मैत्रीण सिया गोयल यांनी रितेशसोबत हत्येचा कट रचला होता. केतनची हत्या कशी करायची, यावर सविस्तर चर्चा केली होती. तसेच सिया आणि चेतनने त्याला लोहागडला सोबत येण्यासाठी वारंवार आग्रही केला होता. दरम्यान रितेशने त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला होता.
परंतु रितेशला केतनच्या खुनाच्या संपूर्ण कटाची आधीच कल्पना होती, असा पोलिसांना संशय आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, केतन अग्रवालच्या हत्येनंतर चेतन चौधरी याने या मित्राची भेट घेतली होती. तसेच सिया गोयल ही देखील त्याच्या संपर्कात होती, अशीही सुत्रांनी माहिती दिली होती.चेतन चौधरीच्या फोनवरून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या रितेशला हुडकून काढलं.
आरोपी हा बीड जिल्ह्यातील मूळ रहिवासी असून बालेवाडीतील एका खाजगी कंपनीत काम करतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तो चेतन चौधरीच्या संपर्कात होता. चौकशीदरम्यान, या कटाबद्दल त्याला नेमकी किती माहिती होती आणि गुन्ह्यात त्याची काय भूमिका होती, हे जाणून घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
१८ जून रोजी लोहागड किल्ल्यावर घडलेल्या घटनाक्रमाबाबतच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा पोलीस सध्या प्रयत्न करत आहेत. कोणाला परिस्थितीची कल्पना होती आणि कोणाला नव्हती, हे जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, तपासादरम्यान आणखी एका आरोपीचे नाव समोर आले आहे; या नवीन घडामोडीवरून असे सूचित होते की, हे प्रकरण आता केवळ दोन आरोपींपुरते मर्यादित राहिलेले नाहीये.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.