Pune-Beed Train: गुड न्यूज! पुण्यावरून बीडला जा सुसाट, नवीन रेल्वे धावणार; कोणत्या मार्गाने जाणार अन् थांबे किती?

Pune-Beed News Train: पुण्यावरून बीडला जाणं आता अधिक सोपं होणार आहे. दोन्ही शहरं आणखी जवळ येणार आहेत. १७ सप्टेंबरपासून पुणे ते बीड नवीन रेल्वे सेवा सुरू होणार आहे.
Pune-Beed Train: गुड न्यूज! पुण्यावरून बीडला जा सुसाट, नवीन रेल्वे धावणार; कोणत्या मार्गाने जाणार अन् थांबे किती?
Pune-Beed News TrainSaam Tv
Published On
  • पुणेकर आणि बीडकरांसाठी आनंदाची बातमी

  • पुणे ते बीड नवीन रेल्वे १७ सप्टेंबरपासून धावणार

  • पुणे-बीड थेट रेल्वे सेवा सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण

  • ७ रेल्वे स्थानकांवर ही रेल्वे थांबणार

पुणे आणि बीडकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे आणि बीडमधील रेल्वे प्रवाशांना गणेशोत्सवात सरकारकडून गिफ्ट मिळाले आहे. पुणे ते बीड नवीन रेल्वे धावणार असून यामुळे प्रवास आणखी सुसाट होणार आहे. मध्य रेल्वे बीड आणि पुणे दरम्यान पहिली दैनंदिन रेल्वे सेवा सुरू करणार आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि इतर मान्यवरांच्या १७ सप्टेंबरला बीड-पुणे या विशेष गाडीला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.

मराठवाडा विभाग आणि पुणे यांच्यातील रेल्वे संपर्क अधिक दृढ करण्यासाठी आणि प्रवाशांची दीर्घकाळापासूनची मागणी पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वे बीड आणि पुणे दरम्यान पहिली दैनंदिन रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर आणि इतर मान्यवर उद्या बीड रेल्वे स्थानकावरून बीड-पुणे या विशेष गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या ट्रेनमुळे बीड ते पुणे अंतर कमी होईल आणि दोन्ही शहरं आणखी जवळ येतील. अगदी कमी वेळात बीडवरून पुण्यात आणि पुण्यावरून बीडमध्ये पोहचणं सोपं होईल.

Pune-Beed Train: गुड न्यूज! पुण्यावरून बीडला जा सुसाट, नवीन रेल्वे धावणार; कोणत्या मार्गाने जाणार अन् थांबे किती?
Mumbai Local Train: पश्चिम रेल्वेच्या लोकल फेऱ्यांचे वेळापत्रक बदलणार; घराबाहेर पडण्यापूर्वी नवीन टाइम टेबल घ्या जाणून

बीड ते पुणे धावणारी विशेष गाडी अमळनेर भांड्याचे, नवीन आष्टी, नारायणडोह, अहिल्यानगर, श्रीगोंदा रोड, दौंड कॉर्ड लाईन आणि उरुळी या ७ स्थानकांवर थांबणार आहे. या गाडीमध्ये २ वातानुकूलित द्वितीय, ३ वातानुकूलित तृतीय, ४ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन अशी संरचना करण्यात आली आहे. पुणे-बीड-पुणे दैनंदिन एक्स्प्रेसची नियमित सेवा लवकरच सुरू होणार आहे. याच्या वेळा आणि थांब्यांची तपशीलवार माहिती स्वतंत्रपणे जाहीर केली जाणार आहे.

Pune-Beed Train: गुड न्यूज! पुण्यावरून बीडला जा सुसाट, नवीन रेल्वे धावणार; कोणत्या मार्गाने जाणार अन् थांबे किती?
Amrit Bharat Express: जळगावमार्गे धावणार नवी अमृत भारत एक्सप्रेस! धुळे आणि अमळनेर भागातील प्रवाशांना मोठा दिलासा

अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पांतर्गत अहिल्यानगर-बीड विभागाचे काम पूर्ण झाल्यानंतर सुरू होणारी ही रेल्वे सेवा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. बीडला पुण्याशी जोडणारी ही पहिलीच थेट रेल्वे सेवा असणार आहे ज्यामुळे हा 'आकांक्षी जिल्हा' भारताच्या प्रवासी रेल्वे नकाशावर येणार आहे. शिक्षण, व्यवसाय, वैद्यकीय उपचार आणि तीर्थयात्रेसाठी पुण्याला प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, रोजचे प्रवासी, व्यापारी, भाविक आणि रुग्ण यांना या रेल्वेचा मोठा फायदा होईल. या रेल्वेमुळे सामाजिक-आर्थिक चालना मिळणार आहे. ही रेल्वे जलद, सुरक्षित आणि किफायतशीर वाहतूक सुविधा देईल. रस्तेमार्गाच्या तुलनेत प्रवासाचा वेळ वाचवेल तसेच स्थानिक अर्थव्यवस्था आणि पर्यटनाला चालना देईल आणि कृषी उत्पादनांची ने-आण सुलभ करेल.

Pune-Beed Train: गुड न्यूज! पुण्यावरून बीडला जा सुसाट, नवीन रेल्वे धावणार; कोणत्या मार्गाने जाणार अन् थांबे किती?
Bullet Train: मुंबई-पुणे प्रवास फक्त 40 मिनिटांत; पुणे, सोलापूरसह 25 हून अधिक शहरं जोडली जाणार! हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला वेग

ही रेल्वेसेवा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील एकात्मता अधिक दृढ करेल आणि पुण्यामार्फत देशाच्या इतर भागांशी संपर्क साधण्यास मदत करेल. मध्य रेल्वे मराठवाडा क्षेत्रातील रेल्वे संपर्क व्यवस्था बळकट करण्यासाठी आणि प्रवाशांना सुरक्षित, आरामदायक आणि परवडणारा प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी ही विशेष रेल्वे कटिबद्ध आहे. बीड आणि पुणे दरम्यान सुरू होणारी ही नवीन रेल्वे सेवा या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यामुळे मराठवाडा-पुणे पट्ट्यातील सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळेल आणि महाराष्ट्रातील जनतेच्या अपेक्षांची पूर्तता होईल.

Pune-Beed Train: गुड न्यूज! पुण्यावरून बीडला जा सुसाट, नवीन रेल्वे धावणार; कोणत्या मार्गाने जाणार अन् थांबे किती?
Railway Rules: कुटुंबीयांची बर्थ वेगवेगळ्या डब्यात मिळाल्यास सीट बदलता येते का? काय आहे रेल्वेचा नियम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com