Rain Update : जुलै महिन्यात महाराष्ट्रात ७ टक्के जास्त पाऊस, मराठवाडा मात्र कोरडाच

Marathwada - Vidarbha Rain Update : जुलै महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा ७ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. पुणे, मुंबई, पालघरसह अनेक जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाला असताना मराठवाडा आणि विदर्भातील काही भाग अजूनही कोरडेच आहेत.
Weather Update News
Weather Update NewsSaam tv
Published On
Summary
  • जुलै महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा ७ टक्के अधिक पावसाची नोंद

  • नाशिक, पुणे, पालघर आणि मुंबईतही समाधानकारक पाऊस

  • मराठवाडा आणि विदर्भ कमी पावसाअभावी कोरडाच

  • ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता

उशिरा दाखल झालेल्या मॉन्सूनने जुलै महिन्यात महाराष्ट्रभर दमदार हजेरी लावत अनेक जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस दिला आहे. जुलै हा मॉन्सूनचा सर्वात महत्त्वाचा महिना मानला जातो. यंदा या महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा सुमारे ७ टक्के अधिक पावसाची नोंद झाली असल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे. मात्र, राज्यभर पावसाचे चित्र सारखे नसून काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला, तर मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये अजूनही सरासरी पावसाची नोंद झालेली नाही.

राज्यात सर्वाधिक पाऊस नाशिक जिल्ह्यात झाला असून येथे सरासरीपेक्षा तब्बल १०४ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ पुण्यात ७० टक्के, पालघरमध्ये ५६ टक्के, साताऱ्यात ५५ टक्के, जळगावमध्ये ५४ टक्के आणि मुंबईत ३२ टक्के अधिक पाऊस झाला. ठाणे, रायगड, बुलढाणा, धुळे, गोंदिया, सांगली आणि कोल्हापूरमध्येही सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.

Weather Update News
Kitchen Hacks : चाकू वापरताना 'या' ७ गोष्टी लक्षात ठेवा; अपघातही टळतील, कामही होईल झटपट

दुसरीकडे, सिंधुदुर्गमध्ये ३७ टक्के, सोलापूरमध्ये ३० टक्के, बीडमध्ये २८ टक्के, नंदुरबारमध्ये २५ टक्के, नागपूर आणि चंद्रपूरमध्ये प्रत्येकी १९ टक्के कमी पाऊस झाला. जालना, अमरावती, गडचिरोली, लातूर, नांदेड, अहमदनगर, रत्नागिरी, वर्धा, भंडारा आणि धाराशिवमध्येही पावसाची तूट कायम आहे. दरम्यान, ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Weather Update News
Ticket Booking : रेल्वेचं तिकीट बुक करताना 'या' ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा; मिनिटांत होईल कन्फर्म

जून ते जुलै महिन्यातील पावसाची जिल्हानिहाय सरासरी

  • मुंबई: ३२ टक्के जास्त

  • ठाणे: १३ टक्के जास्त

  • पालघर: ५६ टक्के

  • पुणे: ७० टक्के जास्त

  • नाशिक: १०४ टक्के जास्त

  • सातारा: ५५ टक्के जास्त

  • अहमदनगर: ५ टक्के कमी

  • रायगड: १७ टक्के जास्त

  • रत्नागिरी: ९ टक्के कमी

  • सिंधुदुर्ग: ३७ टक्के कमी

  • कोल्हापूर: १ टक्के जास्त

  • सांगली: २ टक्के जास्त

  • सोलापूर: ३० टक्के कमी

  • धाराशिव: ६ टक्के कमी

  • बीड: २८ टक्के कमी

  • लातूर: १३ टक्के कमी

  • नांदेड: १२ टक्के कमी

  • यवतमाळ: ५ टक्के जास्त

  • चंद्रपूर: १९ टक्के कमी

  • गोंदिया: ७ टक्के जास्त

  • नागपूर: १९ टक्के कमी

  • अमरावती: १८ टक्के कमी

  • अकोला: १३ टक्के कमी

  • बुलढाणा: १६ टक्के जास्त

  • जालना: १८ टक्के कमी

  • छत्रपती संभाजीनगर: ४१ टक्के जास्त

  • जळगाव: ५४ टक्के जास्त

  • नंदुरबार: २५ टक्के कमी

  • धुळे: २४ टक्के जास्त

  • गडचिरोली: १६ टक्के कमी

  • भंडारा: ५ टक्के कमी

  • वर्धा: ८ टक्के कमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com