Amrit Bharat Express: जळगावमार्गे धावणार नवी अमृत भारत एक्सप्रेस! धुळे आणि अमळनेर भागातील प्रवाशांना मोठा दिलासा

Udhna-Pune Amrit Bharat Express: उधना-पुणे अमृत भारत एक्सप्रेसला मंजुरी मिळाली असून ही ट्रेन नंदुरबार, अमळनेर, जळगाव, चाळीसगाव, मनमाडमार्गे पुण्यापर्यंत धावणार आहे. यामुळे धुळे, जळगाव, अमळनेर आणि नंदुरबारच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Udhna-Pune Amrit Bharat Express:
Udhna-pune Amrit Bharat Express Via Jalgaon; Relief For Dhule And Amalner Passengerssaam tv
Published On
Summary
  • उधना ते पुणे दरम्यान नवीन अमृत भारत एक्सप्रेस सुरू करण्यास मंजुरी

  • जळगाव, धुळे, अमळनेर आणि नंदुरबार परिसरातील प्रवाशांना पुण्याशी रेल्वे कनेक्टिव्हिटीचा फायदा

  • ट्रेनमध्ये आधुनिक कोच, सुधारित आसनव्यवस्था आणि चार्जिंग सुविधा उपलब्ध असणार

सागर निकवाडे, साम प्रतिनिधी

मध्य आणि पश्चिम रेल्वे विभागाने उधना ते पुणे दरम्यान नवीन अमृत भारत एक्सप्रेस सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. ही ट्रेन उधना येथून निघून नंदुरबार,अमळनेर, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर, दौंड कॉर्ड लाईन आणि हडपसर मार्गे पुण्यापर्यंत धावेल.सुरुवातीला सुरत व उधना येथून नंदुरबार मार्गे पुण्यासाठी ट्रेन सुरू करण्याची मागणी प्रदीर्घ काळापासून केली जात होती. (Udhna-pune Amrit Bharat Express Via Jalgaon; Relief For Dhule And Amalner Passengers)

या नवीन रेल्वे गाडीमुळे नंदुरबारसह जळगाव, धुळे व अमळनेर भागातील प्रवाशांचा प्रवास सोयीस्कर होणार आहे.या ट्रेनमध्ये आधुनिक कोच, उत्तम आसनव्यवस्था आणि चार्जिंग सुविधा उपलब्ध असणार असून सध्या गाडी क्रमांक निश्चितीचे व नियोजनाचे अंतिम काम सुरू आहे. दरम्यान मुंबई येथे ११ सप्टेंबर रोजी पश्चिम रेल्वेच्या झेडआरयूसीसीची बैठक झाली.

Udhna-Pune Amrit Bharat Express:
Railway Rules: कुटुंबीयांची बर्थ वेगवेगळ्या डब्यात मिळाल्यास सीट बदलता येते का? काय आहे रेल्वेचा नियम

या बैठकीला महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील झेडआरयूसीसी सदस्य, खासदार, आमदार तसेच पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यात खान्देशातील रेल्वे प्रवाशांच्या विविध मागण्या आणि प्रलंबित प्रश्न झेडआरयूसीसी सदस्य प्रतीक जैन यांनी बैठकीसमोर मांडले. बैठकीदरम्यान उधना ते पुणे नवीन रेल्वे सुरू करण्याच्या मागणीवर विशेष चर्चा झाली होती.

नंदुरबार, शिंदखेडा, दोंडाईचा, अमळनेर, धरणगाव, जळगाव आणि मनमाड या महत्त्वाच्या स्थानकांना जोडणारी ही गाडी सुरू झाल्यास खान्देशातून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. सध्या या मार्गावरील प्रवाशांना उपलब्ध असलेल्या मर्यादित रेल्वे सेवांमुळे अनेकदा मार्ग बदलून किंवा अन्य पर्यायांचा वापर करावा लागतो.

Udhna-Pune Amrit Bharat Express:
Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

त्यामुळे नव्या गाडीची मागणी होत होती. उधना-पुणे नवीन रेल्वेसेवा सुरू होण्याच्या घोषणेमुळे नंदुरबार, धुळे, जळगाव आणि खान्देशातील प्रवाशांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. ही गाडी प्रत्यक्षात कधीपासून धावणार, तिचे वेळापत्रक काय असेल आणि कोणत्या स्थानकांवर नियमित थांबे असतील, हे रेल्वे प्रशासनाकडून अधिकृत वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com