

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा सप्टेंबर महिन्याचा पगार लवकर मिळणार
केंद्रीय कर्मचाऱ्यांना २५ सप्टेंबरला मिळणार सप्टेंबरचा पगार
केंद्रीय पेन्शनधारकांना २५ सप्टेंबरला पेन्शन मिळणार
२८ ते ३० सप्टेंबर बँक संपामुळे मिळणार पगार आगाऊ
केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. या महिन्यात केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या पगार आणि निवृत्तीवेतनासंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सप्टेंबर महिन्याचा पगार आणि निवृत्तीवेतन, जे सहसा महिन्याच्या शेवटी दिले जाते पण ते यावर्षी लवकर दिले जाणार आहे. २५ सप्टेंबरला केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार जमा होईल. तर याच दिवशी निवृत्त वेतनधारकांच्या खात्यात देखील पैसे येतील. २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान प्रस्तावित असलेल्या ३ दिवसीय बँक संपाच्या पार्श्वभूमीवर अर्थ मंत्रालयाने हे पैसे आगाऊ देण्याचा निर्णय घेतला आहे.
अर्थ मंत्रालयाने शुक्रवार दिलेल्या माहितीनुसार, २५ सप्टेंबर २०२६ रोजी सप्टेंबर २०२६ चा पगार आणि निवृत्तीवेतन देण्यास मंजुरी दिली आहे. महालेखा नियंत्रक यांनी २३ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या कार्यालयीन ज्ञापनानुसार, संरक्षण, टपाल आणि दूरसंचार विभागांमधील कर्मचाऱ्यांसह सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा सप्टेंबर महिन्याचा पगार २५ सप्टेंबर रोजी दिला जाण्याची शक्यता आहे. तसंच, औद्योगिक कामगारांचा सप्टेंबर महिन्याचा पगारही २५ तारखेला लवकर दिला जाऊ शकतो. केंद्र सरकारी निवृत्तीवेतनधारकांची सप्टेंबर २०२६ ची निवृत्तीवेतन रक्कम देखील बँका आणि वेतन व लेखा कार्यालया मार्फत २५ सप्टेंबर रोजी दिली जाण्याची शक्यता आहे.
२८ ते ३० सप्टेंबर दरम्यान प्रस्तावित असलेल्या तीन दिवसीय देशव्यापी बँक संपाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या संपादरम्यान बँकिंग व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. बँकांचा संप २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान नियोजित आहे. हा कालावधी सप्टेंबर महिन्याचा शेवट आणि चालू तिमाहीच्या शेवटच्या दिवसांत येतो. बँकिंग सेवांमधील व्यत्ययांमुळे कर्मचाऱ्यांचे पगार आणि निवृत्तीवेतन यांसारख्या महत्त्वाच्या देयकांवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे सरकारने आधीच पगार देण्याचा निर्णय घेतला.
मंत्रालय आणि विभागांना शक्य असल्यास सप्टेंबरच्या शेवटच्या दिवसांसाठी नियोजित असलेली इतर देयके आणि बँकिंग व्यवहार आगाऊ करण्याचा सल्ला सरकारकडून देण्यात आला आहे. सरकारने हे देखील स्पष्ट केले आहे की, २५ सप्टेंबर रोजी मिळालेले वेतन आणि निवृत्तीवेतन आगाऊ रक्कम म्हणून गणले जाईल. सीजीएने भारतीय रिझर्व्ह बँकेला संबंधित बँकांच्या पेमेंट शाखांपर्यंत या सूचना पोहोचवण्याची विनंती केली आहे. बँक संपादरम्यान कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना मिळणाऱ्या नियमित वेतनात कोणताही व्यत्यय किंवा विलंब होऊ नये, हा यामागचा उद्देश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.