एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी
सरकारने ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना दिला दिलासा
आता घरबसल्या NCMC कार्ड रिचार्ज करता येणार
BHIM App वरून NCMC कार्ड टॉप-अप करता येणार
एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. फडणवीस सरकारने प्रवाशांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना एनसीएमसी कार्ड वापरणं अधिक सोपं होणार आहे. एनसीएमसी कार्डधारकांसाठी आता BHIM Appद्वारे सहज Top-up करता येणार आहे. एनसीएमसी कार्ड रिचार्ड करण्यासाठी केंद्रावर जाण्याची गरज लागणार नाही. QR कोड स्कॅन करून काही क्षणांत कार्ड रिचार्ज करता येणार आहे. हे काम घरबसल्या देखील करता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवाशांसाठी डिजिटल सुविधांमध्ये आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. एनसीएमसी कार्डधारकांना आता BHIM Appच्या माध्यमातून आपल्या कार्डचे टॉप-अप करता येणार आहे. त्यामुळे एनसीएमसी कार्डमध्ये शिल्लक रक्कम संपल्यानंतर पुन्हा रिचार्ज करण्यासाठी केंद्रावर जाण्याची आवश्यकता राहणार नाही. मोबाईलच्या माध्यमातून घरबसल्या कार्डमध्ये रक्कम जमा करता येणार आहे.

NCMC कार्ड प्रकल्पांतर्गत अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला सवलतधारक प्रवाशांच्या एनसीएमसी कार्डची नोंदणी आणि वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या सुविधेला अधिक गतिमान आणि प्रवाशांसाठी सोपी करण्याच्या दृष्टीने १५ सप्टेंबर २०२६ पासून BHIM Appद्वारे एनसीएमसी कार्ड टॉप-अपची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या सुविधेचा वापर करण्यासाठी एनसीएमसी कार्डच्या पाठीमागील QR कोड BHIM Appच्या माध्यमातून स्कॅन करावा लागणार आहे. QR कोड स्कॅन केल्यानंतर उपलब्ध प्रक्रियेनुसार टॉप-अप करता येईल. त्यामुळे प्रवाशांना एनसीएमसीकार्डमध्ये आवश्यकतेनुसार रक्कम तात्काळ जमा करण्याची सुविधा मिळणार आहे. एसटी महामंडळाच्या डिजिटल प्रवासी सेवांना अधिक सक्षम करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी एनसीएमसी कार्डचा वापर अधिक सुलभ होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.