'NCMC' कार्डमुळे ST चा स्वस्त प्रवास महागात पडतोय, सर्वसामान्यांना आर्थिक भुर्दंड

Maharashtra ST NCMC Card Problems : एसटीच्या NCMC स्मार्ट कार्डमध्ये तांत्रिक बिघाड आणि सर्व्हर डाऊनमुळे प्रवाशांना मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे. कार्ड असूनही नेटवर्क, रिचार्ज आणि तिकीट काढण्याच्या समस्यांना प्रवाशांना सामोरं जावं लागतंय.
Maharashtra ST Bus Fare Hike
Maharashtra ST Bus Fare Hikegoogle
Published On

ST Bus NCMC Card Server Down : एसटीचा सुखाचा प्रवास आता महाग पडू लागलाय... कारण प्रवाशांच्या सोयीसाठी सुरु केलेल्या स्मार्ट कार्ड यंत्रणेतील तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसतोय.. नेमकं प्रकरण काय आहे? प्रवासी का संतापलेत...पाहूयात या रिपोर्टमधून...

"सुखाचा प्रवास, स्वस्त प्रवास" या STच्या घोषणेचाच बोजवारा उडालाय. याचं कारण आहे NCMC कार्डमधील तांत्रिक बिघाड आणि सर्व्हर डाऊनमुळे प्रवाशांना पडत असलेला आर्थिक भुर्दड . एसटी महामंडळानं 1 सप्टेंबरपासून अर्ध्या तिकिटातील प्रवासासाठी महिला आणि ज्येष्ठांना नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डची सक्ती केली. त्यानुसार राज्यात ठिकठिकाणी गेल्या तीन महिन्यांपासून NCMC कार्डचं रजिस्ट्रेशन आणि वितरण सुरु आहे. मात्र कार्ड धारक असूनही प्रवासावेळी येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे प्रवाशांना कार्डद्वारे अर्ध्या तिकिटात प्रवास करणं शक्य होतं नाही....

Maharashtra ST Bus Fare Hike
Today's Horoscope : कृष्णकृपा! गोकुळाष्टमीला 'या' ७ राशींचे नशीब चमकणार; धनलाभ आणि प्रमोशनचा योग

अचानक कार्ड सक्ती लागू झाल्यामुळे अमरावतीच्या ग्रामीण भागात प्रचंड तारांबळ उडाली आहे.कार्ड मध्ये रिचार्ज असूनही अनेक ठिकाणी नेटवर्क नसल्याने तिकिटेच निघत नाहीत. त्यामुळे प्रवाशांकडे रोख रक्कम मोजावी लागतेय.

शिर्डीतही प्रवाशांना रिचार्ज करण्याची सुविधा तात्काळ उपलब्ध नसल्यानं अर्ध्या प्रवासातच रिचार्ज संपत असल्याच्या तक्रारी समोर येतायत. त्यातच कार्डचं रिचार्ज संपल की महिला प्रवाशांना अर्ध्या प्रवासातच उतरवलं जात असल्याचा आरोपही केला जातोय

Maharashtra ST Bus Fare Hike
सोसायटीत नॉन व्हेज खाण्यावर, पाळीव प्राण्यांवर बंदी घालता येते का? काय सांगतो कायदा? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

दुसरीकडे हिंगोलीच्या बसस्थानकामध्ये स्मार्ट कार्ड काढण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळालीय...मात्र स्मार्ट कार्डधारकांकडे कार्ड असूनही तांत्रिक बिघाडामुळे दुप्पट पैसे प्रवासासाठी द्यावे लागतायत.

दरम्यान प्रवासीचं नव्हे तर वाहक आणि चालक यांनी देखील या तांत्रिक बिघाडाला वैतागून एसटी महामंडळ व्यवस्थापनाचे कार्यालय गाठलयं. मशीन सुरळीत चालत नसल्याची तक्रार महिला कंडेक्टरनी केलीय...

Maharashtra ST Bus Fare Hike
Pune Traffic : पुण्याच्या वाहतुकीत मोठे बदल, २ दिवस हे रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते? यादी एका क्लिकवर

दरम्यान NCMC कार्डसाठी नोंदणी केलेल्या नागरिकांना 30 सप्टेंबरपर्यंत नोंदणीची पावती दाखवून सवलतीचा प्रवास करता येणार असल्याची माहिती बस स्थानक प्रमुखांनी दिलीय...

एसटी महामंडळानं NCMC कार्ड प्रणाली प्रवाशांच्या सोयीसाठी असली तरी पुरेशा तयारीशिवाय आणि ढिसाळ नियोजनामुळे ही योजना सध्या कुचकामी ठरत आहे. जोपर्यंत तांत्रिक त्रुटी दूर होत नाहीत, तोपर्यंत सामान्य प्रवाशांचा हा आर्थिक आणि मानसिक त्रास थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे प्रवाशांसह चालक- वाहकांची डोकेदुखी थांबण्यासाठी एसटी महामंडळांन यावर तातडीवे कारवाई करणं गरजेचं आहे.

अमरावतीहून अमर घटारे, हिंगोलीहून संदीप नागरेसह सचिन बनसोड, शिर्डी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com