Today's Horoscope : कृष्णकृपा! गोकुळाष्टमीला 'या' ७ राशींचे नशीब चमकणार; धनलाभ आणि प्रमोशनचा योग

Gokulashtami Horoscope : गोकुळाष्टमीच्या दिवशी ७ राशींवर कृष्णकृपा राहण्याचे संकेत आहेत. धनलाभ, प्रमोशन आणि करिअरमध्ये प्रगतीची शक्यता कोणत्या राशींना आहे? जाणून घ्या १२ राशींचे भविष्य एका क्लिकवर
today horoscope Gokulashtami 7 lucky zodiac signs
today horoscope Gokulashtami 7 lucky zodiac signsSaam TV Marathi
Published On

today horoscope Gokulashtami 7 lucky zodiac signs : शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मीच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. ग्रहांच्या बदलत्या चालीमुळे रोज सर्व १२ राशींच्या आयुष्यावर वेगवेगळा प्रभाव पडतो. त्यातच शुक्रवारी गोकुळाष्टमी आहे. ७ राशींचं नशीब शुक्रवारी उजळण्याचे योग जुळून आले आहेत. तुमच्या भाग्यात नेमकं काय असेल? प्रमोशन मिळणार? कृष्णाची कृपा राहणार का? जाणून घ्या आजचे १२ राशींचं भविष्य...

मेष (Aries)

आज स्वतःच्या आरोग्याकडे आणि आहाराकडे लक्ष द्या. भरपूर पाणी प्या. नोकरी आणि आर्थिक स्थिती सामान्य राहील. सकारात्मक विचार ठेवा.

वृषभ (Taurus)

दिवसाची सुरुवात छान होईल, पण दुपारनंतर कामाचा वेग मंदावू शकतो. काही अनपेक्षित अडचणींमुळे अपेक्षित यश मिळायला वेळ लागेल.

मिथुन (Gemini)

आजचा दिवस तुमच्यासाठी नशीबवान ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कष्टाचे कौतुक होईल. आरोग्यासाठी आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करा.

today horoscope Gokulashtami 7 lucky zodiac signs
सोसायटीत नॉन व्हेज खाण्यावर, पाळीव प्राण्यांवर बंदी घालता येते का? काय सांगतो कायदा? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

कर्क (Cancer)

नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांनी उधळपट्टी टाळावी. मानसिक ताण घेऊ नका आणि जोडीदाराशी वाद घालणे टाळा.

सिंह (Leo)

आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा ठरू शकतो. आर्थिक स्थिती मजबूत राहील. व्यापाऱ्यांना व्यवसायात चांगला नफा आणि विस्तार करण्याची संधी मिळेल. तळलेले पदार्थ खाणे टाळा.

कन्या (Virgo)

ध्येय गाठण्यासाठी आज जास्त मेहनत करावी लागेल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मतभेद होऊ शकतात. मानसिक आरोग्याची काळजी घ्या.

today horoscope Gokulashtami 7 lucky zodiac signs
महाराष्ट्रातील 'या' बड्या नेत्याची उपपंतप्रधानपदी वर्णी? संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ

तूळ (Libra)

करिअरमध्ये काही चढ-उतार पाहायला मिळतील. अचानक खर्च वाढल्याने बजेट बिघडू शकते, त्यामुळे पैशांचे नियोजन विचारपूर्वक करा. दुपारनंतर मनासारख्या गोष्टी घडण्याचे योग आहेत.

वृश्चिक (Scorpio)

व्यावसायिक कामात थोडे नुकसान किंवा मंदी जाणवू शकते. स्वतःचे कौशल्य वाढवण्यासाठी आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. दुपारनंतर अचानक धनलाभाची शक्यता आहे.

धनु (Sagittarius)

आरोग्याची विशेष काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी अहंकार बाजूला ठेवा; ज्युनियर्सकडून मिळणाऱ्या चांगल्या सल्ल्यांचाही स्वीकार करा.

today horoscope Gokulashtami 7 lucky zodiac signs
PM Kisan Installment : शेतकर्‍यांच्या खात्यात ₹2,000 येणार की ₹4,000? पीएम किसानच्या हप्त्याची अपडेट समोर

मकर (Capricorn)

आर्थिक आवक ठीक राहील, पण काही अचानक उद्भवणारे खर्च ताण वाढवू शकतात. शांत राहून स्वतःसाठी वेळ काढा.

कुंभ (Aquarius)

कुटुंबाकडून एखादी आनंदवार्ता मिळेल. व्यवसायात चांगला फायदा होईल, मात्र ऑफिसमधील राजकारणापासून सावध राहा.

मीन (Pisces)

कष्टाचे चीज होऊन नोकरीत प्रमोशन किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलताना जरा जपून राहा.

टीप: ही माहिती सामान्य मान्यतेवर आधारित आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com