PM Kisan Installment : शेतकर्‍यांच्या खात्यात ₹2,000 येणार की ₹4,000? पीएम किसानच्या हप्त्याची अपडेट समोर

PM Kisan 24th Installment: पीएम किसानच्या २४ व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. काही पात्र शेतकऱ्यांना मागील रखडलेल्या हप्त्यासह एकूण ₹४,००० मिळू शकतात, अशी माहिती समोर आली आहे.
PM Kisan Yojana 24th Installment Increase or Not
PM Kisan Yojana 24th Installment Increase or Notgoogle
Published On

केंद्र सरकारच्या 'पीएम किसान सन्मान निधी' योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाखो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. दरवेळी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २,००० रुपयांचा हप्ता जमा होत असतो. पण यावेळी २४ व्या हप्त्यात काही शेतकऱ्यांना थेट ४,००० रुपये मिळणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. नक्की कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात डबल म्हणजेच ४,००० रुपये जमा होणार? यामागील नियम आणि अटी काय आहेत? जाणून घ्या या संदर्भातील संपूर्ण सत्य...

पीएम किसान सन्मान निधीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षातून तीन वेळा जमा केली जाते. दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारकडून सन्मान निधी जमा केला जातो. याआधी २३ वा हप्ता जूनमध्ये वितरित करण्यात आला होता. त्यामुळे चार महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर पुढील हप्ता ऑक्टोबरमध्ये येण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरमध्ये दुर्गापूजा देखील असते, त्यामुळे हा हप्ता सणापूर्वी मिळेल अशी शक्यता आहे.

देशभरातील काही शेतकऱ्यांना ₹४,००० चा हप्ता मिळणार आहे. पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्येक हप्ता २ हजार रूपयांचा मिळतो. पण पण यावेळी अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात ₹२,००० ऐवजी ₹४,००० जमा होऊ शकतात. पण त्याचे कारणही समोर आले आहे.

PM Kisan Yojana 24th Installment Increase or Not
पुण्यातून अपहरण, अन् समृद्धी महामार्गावर थरार! ३ किमी पाठलाग करत तरूणीसह ६ जणांना बेड्या

कोणत्या शेतकऱ्यांना ₹४,००० मिळतील?

२३ हप्ता काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता. ईकेवायसी आणि जमिनीच्या पडताळणीमुळे शेतकऱ्यांचा हप्ता रखडला होता. आता ज्या शेतकऱ्यांनी ईकेवायसी केली आहे, त्या शेतकऱ्यांच्या खात्यात २ हप्त्याचे ४ हजार एकत्र जमा केले जाऊ शकतात. राज्य सरकारकडून पडताळणीनंतर, ज्या लाभार्थ्यांनी रखडलेल्या प्रक्रिया किंवा कागदपत्रांमधील चुका दुरुस्त केल्या आहेत, त्यांची नावे पुढे पाठवतात. एकदा त्यांची नावे मंजूर झाल्यावर, अशा शेतकऱ्यांना एकूण ₹४,००० मिळतील. त्यामध्ये २४ व्या हप्त्यातील ₹२,००० आणि मागील २३ व्या हप्त्यातील उर्वरित ₹२,००० यांचा समावेश असेल. अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे की, सर्व शेतकऱ्यांना ₹४,००० मिळणार नाहीत; ज्यांना त्यांचा २३ वा हप्ता वेळेवर मिळाला आहे, त्यांना नियमांनुसार केवळ २४ व्या हप्त्याचे नियमित ₹२,००० मिळतील.

PM Kisan Yojana 24th Installment Increase or Not
Pune : पुण्यात खळबळ! मध्यरात्री प्रसिद्ध रीलस्टारला पोलिसांनी उचललं; अटकेचा LIVE व्हिडिओ समोर

पीएम किसान योजनेच्या हप्त्याची स्थिती (Status) ऑनलाइन कशी तपासावी?

सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला (pmkisan.gov.in) भेट द्या.

'Know Your Status' वर क्लिक करा:

होमपेजवरील 'Farmers Corner' (शेतकरी कॉर्नर) विभागात जा आणि 'Know Your Status' (तुमची स्थिती जाणून घ्या) या पर्यायावर क्लिक करा.

तुमचा नोंदणी क्रमांक (Registration Number) आणि स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड (Captcha Code) व्यवस्थित प्रविष्ट करा.

तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला OTP प्रविष्ट करा आणि सबमिट करा.

प्रक्रिया पूर्ण होताच तुमच्या खात्यातील हप्त्याची सद्यस्थिती, बँक खात्याची जोडणी आणि e-KYC पूर्ण झाले आहे की नाही, याची संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com