Pune : पुण्यात खळबळ! मध्यरात्री प्रसिद्ध रीलस्टारला पोलिसांनी उचललं; अटकेचा LIVE व्हिडिओ समोर

Pune Reel Star Santosh Pandit Arrested : पुण्यात प्रसिद्ध रीलस्टार संतोष पंडित यांना मध्यरात्री पोलिसांनी अटक केली. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधातील कथित आक्षेपार्ह व्हिडिओप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अटकेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Santosh Pandit Arrest
Santosh Pandit Arrestसाम टीव्ही
Published On

सचिन पाटील, पुणे प्रतिनिधी

Santosh Pandit Arrest : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टार संतोष पंडित यांना मध्यरात्री एक वाजता अटक करण्यात आली. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टिप्पणी केल्याप्रकरणी संतोष पंडित यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. मध्यरात्री एक वाजता पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. संतोष पंडित यांना अटक केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात आक्षेपार्ह असलेला व्हिडिओ पोस्ट केल्याप्रकरणी संतोष पंडित यांना चांगलेच महागात पडले. सोशल मीडियावर आक्षेपार्ह व बदनामीकारक मजकूर तसेच व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संतोष पंडित यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून, सारिका कांबळे या महिलेने ही तक्रार दिली आहे.

Santosh Pandit Arrest
महायुतीत पुन्हा जुंपली! भाजपने बोगस मतदानाने सत्ता मिळवली, शिंदेंच्या मंत्र्यांचा खळबळजनक आरोप, नेमकं प्रकरण काय?

पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित व्यक्तीने ‘संतोष पंडित 6278’ या यूट्यूब अकाउंटवरून चंद्रकांत पाटील व मिताली साळवेकर यांच्याबाबत आक्षेपार्ह स्वरूपाचा मजकूर आणि व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप आहे. या पोस्ट व व्हिडिओंमुळे बदनामी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच, संबंधित पोस्टला मोठ्या प्रमाणावर व्ह्यूज मिळाल्याचेही तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे.

Santosh Pandit Arrest
Global Warming : मुंबई जगाच्या नकाशावरून गायब होणार? UN च्या अहवालात भारताला भयानक इशारा; पुढील काही वर्षांत काय घडणार?

याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०३६१/२०२६ नोंदवण्यात आला असून भारतीय न्याय संहितेच्या कलम ७५(१)(iv), ७५(३), ३५६(२), ३५२ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे १.२८ वाजता या गुन्ह्याची नोंद झाली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल शिवाजी माने यांच्याकडे सोपवण्यात आला असून कोथरूड पोलीस अधिक तपास करत आहेत.

Santosh Pandit Arrest
Maratha bandh : मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र पेटला! बीडसह उद्या ४ जिल्हे कडकडीत बंद; काय सुरू आणि काय बंद? पाहा संपूर्ण यादी

मध्यरात्री कारवाई अन् अटकेचा व्हिडिओ व्हायरल

गुन्हा दाखल झाल्यानंतर पुण्याच्या डेक्कन पोलिसांनी तातडीने पावले उचलली. मध्यरात्री सुमारे १ वाजता पोलिसांचे पथक संतोष पंडित यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी घरातून ताब्यात घेतानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला असून तो सध्या वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com