Manasvi Choudhary
एकापेक्षा जास्त बँक अकाउंट असणे आता सामान्य झाले आहे. अनेकजण पगार येण्यासाठी, घरखर्चासाठी आणि सेव्हिंगसाठी असे अनेक अकाऊंट एक व्यक्ती सुरू करते.
पण तुम्हाला माहितीये का? एका पेक्षा जास्त बँकेचे अकाऊंट तुम्ही सुरू करणे खरंच योग्य आहे का ? एक व्यक्ती एकून किती अकाउंट सुरू करू शकते? हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या
बँक अकाऊंट सुरू करण्याविषयी कोणतेही मर्यादा नाही. एक व्यक्ती कितीही बँक अकाऊंट सरू करू शकते.
जास्त बँक खाते असणे म्हणजे तुम्हाला जास्त फायदा होतो असे नाही हे देखील लक्षात घेणे महत्वाचे आहे.
सामान्य एक व्यक्तीसाठी १ मुख्य अकाऊंट सॅलरी आणि खर्चाचे आणि २ अकाउंट बचतीचे हे सामान्य मानले जाते.
पाहिल्या खात्यातून रोजचा आणि घरातील खर्च भागवला जातो तर दुसऱ्या खात्यात पैसे बचत केले जातात.
प्रत्येक बँकेनुसार अकाऊंट सुरू करण्याचे वेगवेगळे नियम असू शकतात. तुम्ही खात्यात आवश्यक बॅलन्स न ठेवल्यास तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.