सोन्याची खाण कोसळली, ढिगाऱ्याखाली अडकून 82 जणांचा करूण अंत

Sudan Illegal Gold Mine Collapse 82 People Killed: सूडानच्या पश्चिम कोर्डोफान प्रांतातील अल-जारा अवैध सोन्याची खाण कोसळून 82 जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही अनेक जण अडकले असण्याची शक्यता असून बचावकार्य सुरू आहे.
Sudan illegal gold mine collapse 82 people killed
Sudan illegal gold mine collapse 82 people killedsaam tv
Published On

उत्तर अफ्रिकेतील सूडानच्या दुर्गम भागात अवैध सोन्याची खाण कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत मृतांचा आकडा 82 वर पोहोचला आहे. स्थानिक अधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी बचाव पथकांकडून मर्यादित साधनसामग्रीच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध सुरू होता. अनेक जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती आहे.

Sudan illegal gold mine collapse 82 people killed
Gold Mine Accident: सोन्याच्या खाणीत अचानक दरड कोसळली, 100 हून अधिक जणांचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली अजूनही अनेक मजूर अडकले

ही दुर्घटना पश्चिम कोर्डोफान प्रांतातील नुहुद शहरात असलेल्या अल-जारा सोन्याच्या खाणीत घडली. वाचलेल्या कामगारांच्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री उशिरा खाण अचानक कोसळली. त्यानंतर मोठ्या संख्येने नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले. बुधवारी दुपारपर्यंत बचाव पथकाने 82 मृतदेह बाहेर काढले होते. मात्र, अद्याप अनेक जण बेपत्ता असून ढिगाऱ्याखाली आणखी नागरिक अडकले असण्याची शक्यता आहे. खाणीत अजूनही काही नागरिक अडकले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मर्यादित उपकरणांच्या मदतीने बचाव पथकांकडून ढिगाऱ्यात अडकलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.

Sudan illegal gold mine collapse 82 people killed
Building collapse: बांधकाम सुरू असतानाच अचानक कोसळला इमारतीचा मोठा स्लॅब; 15 जणांना वाचवलं, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

ही दुर्घटना घडलेला पश्चिम कोर्डोफान प्रांतातील भाग अर्धसैनिक दल रॅपिड सपोर्ट फोर्सेस (RSF)च्या नियंत्रणाखाली आहे. RSF आणि सुदानी लष्करामध्ये तीन वर्षांहून अधिक काळ संघर्ष सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर खाण दुर्घटनेनंतर बचाव आणि मदतकार्य मोठ्या आव्हानात्मक परिस्थितीत सुरू आहे. मलबा हटवून बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्याचे काम सध्या सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com