Good News: पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! ऑक्टोबरमध्ये मिळणार ५ महिन्यांच्या पेन्शनची थकबाकी; एकाचवेळी किती पैसे मिळणार?

Pension Arrears Update: पेन्शनधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. पुढच्या महिन्यात ५ महिन्यांच्या पेन्शनचे पैसे एकत्र मिळणार आहेत. पेन्शनधारकांना किती पैसे एकत्र मिळणार ते घ्या जाणून...
Good News: पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! ऑक्टोबरमध्ये मिळणार ५ महिन्यांच्या पेन्शनची थकबाकी;  एकाचवेळी किती पैसे मिळणार?
Pension Arrears Saam Tv
Published On: 
  • ओडिशातील २० लाखांहून अधिक पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज

  • पाच महिन्यांच्या पेन्शनच्या थकबाकीचे पैसे एकत्र मिळणार

  • पेन्शनधारकांच्या खात्यात ऑक्टोबरमध्ये पैसे जमा होणार

  • ६० ते ८० वर्षांच्या पेन्शनधारकांना होणार फायदा

पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण बऱ्याच महिन्यांपासून पेन्शनची वाट पाहणाऱ्या लाखो ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळणार आहे. ५ महिन्यांच्या पेन्शनची थकबाकी त्यांच्या खात्यात ऑक्टोबरमध्ये जमा होणार असल्याची महत्वाची माहिती समोर आली आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन योजनेअंतर्गत, ओडिशातील २० लाखांहून अधिक ज्येष्ठ पेन्शनधारकांना त्यांची अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेली पेन्शन एकाच वेळी मिळणार आहे.

महत्वाचे म्हणजे, पेन्शनसोबतच प्रलंबित थकबाकीसुद्धा त्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. त्यामुळे नवरात्र आणि दिवाळी सणांच्या दिवसांपूर्वी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळणार आहे. ओडिशा सरकारने स्पष्ट केले आहे की, पेन्शनधारकांची थकबाकी लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. तांत्रिक अडचणींमुळे मे महिन्यापासून अडकलेली ही रक्कम ऑक्टोबरपर्यंत पूर्णपणे देण्याची सरकारची योजना आहे.

Good News: पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! ऑक्टोबरमध्ये मिळणार ५ महिन्यांच्या पेन्शनची थकबाकी;  एकाचवेळी किती पैसे मिळणार?
Good News: ST प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, घरबसल्या NCMC कार्ड रिचार्ज करता येणार; कसं ते वाचा...

सामाजिक सुरक्षा आणि दिव्यांग सक्षमीकरण मंत्री नित्यानंद गोंड यांनी स्पष्टपणे सांगितले की, तांत्रिक अडचणींमुळे काही लाभार्थ्यांना गेल्या ५ महिन्यांपासून त्यांचे निवृत्तीवेतन मिळालेले नाही. सरकार आता ही प्रलंबित थकबाकीची रक्कम पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत आहे. प्रलंबित पेन्शन आणि थकबाकी ऑक्टोबरपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात हस्तांतरित केली जाणार आहे. हे सुनिश्चित करण्यासाठी वित्त विभाग, केंद्र सरकार आणि ट्रेझरी एकत्रितपणे काम करत आहेत.

Good News: पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! ऑक्टोबरमध्ये मिळणार ५ महिन्यांच्या पेन्शनची थकबाकी;  एकाचवेळी किती पैसे मिळणार?
Good News: 7 तासांत पुण्यावरून बीडला पोहचा, नवीन ट्रेन सुरू; तिकीट किती अन् थांबे कुठे?

ओडिशामधील इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत, ६० ते ७९ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना दरमहा १,००० चे निवृत्तीवेतन मिळते. जर एखाद्या लाभार्थ्याच्या खात्यात ५ महिन्यांपासून निवृत्तीवेतन जमा झाले नसेल तर ऑक्टोबर महिन्यात त्यांच्या खात्यात एकाचवेळी थकीत असलेले ५,००० रुपयांची रक्कम जमा केली जाईल. ८० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना ३,५०० चे मासिक निवृत्तीवेतन दिले जाते. या लाभार्थ्यांना त्यांच्या ५ महिन्यांची प्रलंबित निवृत्तीवेतन रक्कम मिळाली नाही त्यांना एकाचवेळी १७,५०० रुपये मिळतील.

Good News: पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! ऑक्टोबरमध्ये मिळणार ५ महिन्यांच्या पेन्शनची थकबाकी;  एकाचवेळी किती पैसे मिळणार?
Good News: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, २५ सप्टेंबरला मिळणार पगार; सरकारचा मोठा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com