26/11 HERO QUESTIONS RAJ THACKERAY: महाराष्ट्रातील हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र आले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी खणखणीत भाषण करत राज्यात हिंदीची सक्ती चालणार नाही. मराठीसाठी सर्वांनी एकत्र आलेच पाहिजे. मराठीचा अपमान, अवमान सहन केला जाणार नाही, अशी भूमिका घेतली. ठाकरेंच्या या भाषाणानंतर पुन्हा एकदा मराठी आणि हिंदी असा वाद उफळलाय. या वादात २६/११ हल्ल्यातील हिरो माजी मार्कोस कमांडो प्रविण कुमार तेवातिया यांनी उडी घेतली आहे. प्रविण कुमार याने थेट राज ठाकरेंवर निशाणा साधलाय. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यावेळी मी १५० जणांचा जीव वाचवला. मी उत्तर प्रदेशचा आहे, महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडले, त्यावेळी तुमचे योद्धे कुठे होते? असा सवाल त्यांनी राज ठाकरेंना विचारलाय.
प्रविण कुमार तेवातिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत राज ठाकरेंच्या भूमिकेवर निशाणा साधलाय. तेवतिया यांनी २००८ मध्ये झालेल्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात ताज हॉटेलमध्ये १५० हून अधिक लोकांचे प्राण वाचवले होते. त्यांनी आता मराठी आणि हिंदीच्या वादात उडी घेतली आहे. तेवातिया यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले की," 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यावेळी मी मुंबई, ताज वाचवले. मी महाराष्ट्रासाठी रक्त सांडले. पण मी यूपीचा आहे. राज ठाकरेंचे तथाकथित योद्धे तेव्हा कुठे होते? देशाला विभागू नका."
मीरा-भाईंदरमधील एका दुकानदाराला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच धडा शिकवला होता. व्यापाऱ्याला मराठी न बोलल्याने मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंसाचाराला चिथावणी देणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पोस्टला रिट्वीट करत तेवतिया यांनी म्हटले की, भाषेच्या नावावर देशाला विभागणे चुकीचे आहे.
तेवातिया यांच्या ट्वीटनंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर आपली भूमिका कायम ठेवत हिंदीच्या कथित सक्तीविरोधात आवाज उठवला आहे. हा वाद आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.