Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

Raj and Uddhav Thackeray at Mumbai rally : ठाकरेंच्या हिंदीविरोधी लढ्याला तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचा पाठिंबा, आंदोलन प्रेरणादायी असल्याचे सांगत केंद्राच्या भाषाविषयक धोरणांवर कठोर सवाल उपस्थित केले.
MK Stalin supports Raj and Uddhav Thackeray’s anti-Hindi imposition movement
Raj and Uddhav Thackeray at Mumbai rally; Tamil Nadu CM MK Stalin praises their unity and language rights movement against Hindi imposition.saam TV News Marathi
Published On

MK Stalin supports Raj and Uddhav Thackeray’s anti-Hindi imposition movement : हिंदी सक्तीविरोधात ठाकरेंनी उभारलेल्या लढ्याला आता दक्षिणेच्या राज्यांकडूनही पाठिंबा मिळत आहे. मराठी आणि महाराष्ट्रासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे १९ वर्षांनतर एकत्र आले. या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी मनसे-शिवसेनेचे कार्यकर्ताचा जनसागर वरळीत लोटला होता. यावेळी ठाकरेंनी आपल्या खास शैलीत सत्ताधांऱ्यावर आसूड उघारला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या या भूमिकेच तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी कौतुक केलेय. ठाकरेंचा हा लढा प्रचंड प्रेरणादायी असल्याचे त्यांनी म्हटलेय.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांन एक्सवर एक पोस्ट करत हिंदी सक्तीविरोधातील आपली भूमिका स्पष्ट केली. त्याशिवाय त्यांनी ठाकरेंच्या एकीचेही कौतुक केलेय. उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये तिसरी भाषा कोणती शिकवली जाते? असा सवालही यावेळी स्टॅलिन यांनी उपस्थित केला. राज ठाकरेंच्या प्रश्नांची उत्तरे केंद्र सरकारकडे नसल्याचेही स्टॅलिन यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

MK Stalin supports Raj and Uddhav Thackeray’s anti-Hindi imposition movement
Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

महाराष्ट्रातील हिंदीसक्ती विरोधातील आंदोलन हे नवचैतन्य आणि प्रेरणा देणारे आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी ठाकरे बंधूंचे कौतुक केले. महाराष्ट्रात सुरू झालेली ही लढाई केवळ भावनिक नाही तर बौद्धिक आहे. ही लढाई भारताच्या बहुभाषिक संस्कृतीच्या रक्षणासाठी असल्याचेही ते म्हणाले.

MK Stalin supports Raj and Uddhav Thackeray’s anti-Hindi imposition movement
ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

स्टॅलिन यांनी आपल्या पोस्टमध्ये काय म्हटले ?

तमिळनाडूच्या जनतेने पिढ्यानपिढ्या चालवलेली भाषिक हक्कांची लढाई आता राज्यांच्या सीमा ओलांडून महाराष्ट्रात आंदोलनाच्या वादळासारखी घोंघावत आहे. तमिळनाडूच्या शाळांमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवली तरच निधी देऊ, असे बेकायदेशीर आणि मनमानी पद्धतीने वागणाऱ्या भाजपला, ज्या महाराष्ट्रात ते सत्तेत आहेत, तिथे जनतेच्या उद्रेकाच्या भीतीने दुसऱ्यांदा माघार घ्यावी लागली आहे.

हिंदी लादण्याच्या विरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत झालेल्या विजयोत्सव रॅलीचा उत्साह आणि प्रभाव प्रचंड प्रेरणादायी आहे.

MK Stalin supports Raj and Uddhav Thackeray’s anti-Hindi imposition movement
Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये तिसरी भाषा कोणती शिकवली जाते? आणि हिंदी भाषिक राज्ये मागासलेली आहेत - मग हिंदी न बोलणाऱ्या प्रगत राज्यांच्या लोकांवर हिंदी का लादता? असे प्रश्न राजठाकरे यांनी उपस्थित केले. या प्रश्नांना, हिंदीच्या विकासाला पूर्णवेळ प्राधान्य देणाऱ्या केंद्र सरकारकडे कोणतेही उत्तर नाही, हे मला चांगलेच ठाऊक आहे, असे स्टॅलिन म्हणाले.

त्रिभाषिक धोरणाच्या नावाखाली हिंदी-संस्कृत लादणाऱ्या नव्या शैक्षणिक धोरणाला मान्यता दिली, तरच २,१५२ कोटी रुपये निधी मंजूर करू, अशी तमिळनाडूला धमकी देणारी केंद्र सरकारची वृत्ती बदलेल का? तमिळनाडूच्या शाळकरी मुलांच्या शिक्षणासाठी कायदेशीररित्या द्यावा लागणारा निधी तात्काळ सोडेल का?

MK Stalin supports Raj and Uddhav Thackeray’s anti-Hindi imposition movement
अनाजीपंत, अंतरपाट ते बाळासाहेब...; ठाकरे बंधू फडणवीसांवर तुटून पडले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com