Vijay Melava
५ जुलै रोजी मुंबईतील वरळी डोम येथे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या उपस्थितीत विजय मेळावा आयोजित केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारनं शाळांमध्ये पहिली ते चौथीपर्यंत हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवण्याचा निर्णय घेतला होता. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसह मराठी जनतेनं या निर्णयाला विरोध केला होता. हिंदी सक्तीच्या विरोधात मुंबईत राज आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, सरकारनं हा निर्णय मागे घेतला. आता याच मोर्चाचं रुपांतर विजय मेळाव्यात झालं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे स्वतः या मेळाव्याला उपस्थित राहतील. मराठी माणसानं या मेळाव्यात सहभागी व्हावे, असं आवाहन करण्यात आले आहे. मराठी माणसाच्या एकजुटीचे दर्शन या मेळाव्यातून घडणार आहे.