Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Raj-Uddhav Thackeray Vijay Melava: हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केल्यानंतर ठाकरे बंधू अर्थात राज-उद्धव ठाकरे हे विजयी मेळाव्यासाठी एकत्र आले. परंतु ही सुरुवात असून पुढे असेच एक राहू असं म्हणत दोन्ही बंधूंनी महायुती सरकारसमोरचं टेन्शन वाढवलंय.
Maharashtra Politics
Raj-Uddhav Thackeray Vijay Melavasaam tv File Photo
Published On

सुप्रिम मसकर, साम प्रतिनिधी

आवाज मराठीचा आणि ताकद महाराष्ट्राची, हीच भावना प्रत्येक मराठी माणसाची आहे. कारण ठाकरेंच्या एकीमुळे फक्त मुंबई महापालिकेतच नाही तर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांचं समीकरण बदलण्याच्या चर्चांनी जोर धरलाय. तर उद्धव ठाकरेंनी थेट महाराष्ट्र काबीज करण्याचा निर्धार केलाय. खरंतर मनसे आणि ठाकरे सेनेला विधानसभा निवडणूकीत मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. मात्र विधानसभेतील मतांचं गणित नेमकं काय आहे? पाहूयात.

विधानसभेला मतांचं गणित काय?

भाजप- 26.77 टक्के

शिंदे सेना- 12.38 टक्के

राष्ट्रवादी (AP)- 9.01 टक्के

ठाकरे सेना- 9.96 टक्के

राष्ट्रवादी (SP)- 11.28 टक्के

काँग्रेस- 12.42 टक्के

मनसे- 1.55 टक्के

विधानसभेला महाराष्ट्रात ठाकरेंची मोठी पिछेहाट झाली असली तरी मुंबई महापालिकेत जनतेने ठाकरेंनाच झुकतं माप दिलं. मनसे आणि ठाकरे सेनेला 30 टक्के मतं मिळालेत. मात्र एका सर्व्हेक्षणानुसार मुंबईत ठाकरे बंधूंची युती झाल्यास 52 टक्के मतं वळण्याची शक्यता आहे. तर ठाकरे बंधूंच्या युतीचा राज्यावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

मुंबई, ठाणे, पुणे नाशिकसह मराठवाड्यात ठाकरेंचा प्रभाव

2017 च्या निकालानुसार ठाकरेंची 2 महापालिकेत सत्ता

मनसेलाही 2 नगरपंचायतीवर झेंडा फडकवण्यात यश

Maharashtra Politics
Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

आता दोन्ही ठाकरे एकत्र आल्याने पश्चिम विदर्भ, मराठवाड्यासह मुंबई, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंची ताकद वाढण्याचा अंदाज आहे. तर मराठीच्या विजयी मेळाव्यात ठाकरेंनी सरकारविरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे ठाकरेंचं लक्ष्य हे मुंबई महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आहे, हे मात्र निश्चित. त्यामुळे ठाकरे बंधूंची एकी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून विजयी गुढी उभारणार का? याचीच उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com