Marathi Vijay Melava

महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिली ते चौथीपर्यंत हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवण्यात येईल असा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता. मात्र, हिंदी सक्ती होऊ देणार नाही असा पवित्रा राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी घेतला. मराठी जनतेनंही त्याला विरोध केला. त्यामुळं हिंदी भाषेसंदर्भात काढलेले दोन जीआर सरकारने रद्द केले. त्यामुळं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी ५ जुलै रोजी मुंबईतील वरळी डोम येथे विजय मेळावा साजरा करण्याचा निर्णय घेतला. याच मेळाव्यात राजकीय मतभेदांमुळं वेगळे झालेले ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर येणार आहेत.
Read More
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com