ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Kailas Ugle, Kalpana Ugle, Nashik Warkari : पंढरपूरमध्ये पहाटे अडीच वाजल्यापासून पूजा, टाळ-मृदंगाचा गजर, विठ्ठलनामाचा जयघोष सुरू आहे. चंद्रभागा नदीच्या तीरावर लाखो भाविकांनी स्नान केले. दर्शनासाठी आलेल्या गर्दीने मंदिराजवळील परिसर २२ किलोमीटरपर्यंत व्यापला आहे.
Kailas and Kalpana Ugle of Nashik honored as Chief Warkaris during CM Fadnavis’ Ashadhi Mahapuja in Pandharpur
Kailas and Kalpana Ugle of Nashik honored as Chief Warkaris during CM Fadnavis’ Ashadhi Mahapuja in Pandharpur Saam TV News Marathi
Published On

Ashadhi Ekadashi 2025 : ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…चला पाहू रे सोहळा पंढरीचा.. महाराष्ट्रातून लाखो वारकरी, भक्त विठू माऊलीच्या दर्शनासाठी पंढरीत दाखल झाले आहे. एकादशी वारकऱ्यांसाठी सण असतो. विठ्ठल दर्शन घेण्यासाठी लाखो वारकरी पंढरपूर मध्ये पोहचले आहेत. पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल महापूजा संपन्न झाली. यावेळी मानाच्या वारकऱ्याचा मान पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्याला मिळाला. दामू उगले आणि कल्पना उगले हे यंदाचे मानाचे वारकरी ठरले.

गेल्या १२ वर्षांपासून विठ्ठलभक्तीत लीन असलेल्या उगले दाम्पत्याने पहाटे मंदिरात थेट मुख्यमंत्री दांपत्यासोबत विठ्ठल-रुक्मिणीची पूजा केली. पूजेनंतर त्यांचा शासकीय सत्कारही करण्यात आला. विशेष म्हणजे, सलग दुसऱ्या वर्षी मानाचा वारकरी नाशिक जिल्ह्यातूनच निवडला गेलाय. विठ्ठलाचं दर्शन रांग बंद करतेवेळी रांगेमध्ये उभे असणार्‍या प्रथम दाम्पत्याला मानाचा वारकरी म्हणून मान मिळतो.

विठल रुख्मिणी आराध्य दैवत आहे. पांडुरंगचा आशीर्वाद मिळत राहो. पांडुरंग मनातला ओळखणारा आहे, राज्यावरील पुढची संकटे दूर व्हावीत, बळीराजा सुखी समाधानी व्हावा अशी प्रार्थना करतो.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र

विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात भक्तीचा महापौर लोटला आहे. चंद्रभागेच्या तीरावर स्नानासाठी भाविकांची झुंबड उडाली आहे. आज आषाढी एकादशी आहे, त्यानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या शुभहस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. त्यांच्यासोबत वारकरी प्रतिनिधी म्हणून नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील शेतकरी कैलास दामू उगले (५२ वर्षे) आणि कल्पना उगले (४८ वर्षे) यांना महापूजा करण्याचा मान मिळाला. कैलास उगले हे शेतकरी असून ते गेल्या बारा वर्षांपासून पंढरपूरला आषाढी वारीसाठी नियमित येतात.

Kailas and Kalpana Ugle of Nashik honored as Chief Warkaris during CM Fadnavis’ Ashadhi Mahapuja in Pandharpur
Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

आषाढी एकादशीच्या मुख्य सोहळ्यानिमित्त पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मोठ्या उत्साहात व चैतन्यमय वातावरणात संपन्न झाली. शासकीय महापूजा संपन्न झाल्यानंतर मानाच्या वारकरी उगले दांपत्य याचा सत्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. एक वर्षाचा एस टी पास फ्री या मानाच्या वारकऱ्यांना देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मानाचा वारकरी मिळाला आहे. गतवर्षीही नाशिक जिल्ह्यातीलच मानाचे वारकरी होते. दरम्यान, यंदाच्या आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरीत १५ लाखाहून अधिक वारकरी, भाविक दाखल झालेत. विठ्ठलाचे दर्शनाची रांग ५ किलोमीटर पर्यंत पोहोचलेय. चंद्रभागेच्या तीरावर स्नान करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

Kailas and Kalpana Ugle of Nashik honored as Chief Warkaris during CM Fadnavis’ Ashadhi Mahapuja in Pandharpur
ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com