Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Prataprao Jadhav News Marathi : प्रताप जाधवांच्या "मुंबई गुजरातची राजधानी होती" या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं असून ठाकरे गट आणि मनसेकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
Prataprao Jadhav Sparks Row
Prataprao Jadhav Sparks Row
Published On

Prataprao Jadhav Sparks Row: शिवसेना अध्यक्ष, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात जय गुजरात म्हटल्यानंतर महाराष्ट्रात गदारोळ उडाला होता. हा वाद शांत होतो ना होतो तोच आता शिवसेना खासदार आणि केंद्रीय मंत्री प्रताप जाधव यांच्या वक्तव्याने वाद उफाळण्याची शक्यता आहे. धाराशिवमध्ये बोलताना प्रतापराव जाधव यांनी मुंबई गुजरातची राजधानी होती असे वक्तव्य केलेय. गुजरात हे आपलेच शेजारी राज्य आहे, ते पाकिस्तानात नाही, असेही ते म्हणाले. जाधवांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. शनिवारी धाराशिवमध्ये तुळजभवानीच्या दर्शनानंतर माध्यमांशी संवाद साधताना प्रतापराव जाधवांनी हे वक्तव्य केलं.

नेमकं प्रताप जाधव काय म्हणाले ?

संयुक्त महाराष्ट्र असताना गुजरात महाराष्ट्र आपण त्यामध्ये होतो. मुंबई गुजरातचीही राजधानी होती, मुंबईमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गुजराती राहतात. गुजरात हा काही पाकिस्तानचा प्रांत नाही, आपल्याच शेजारचे राज्य आहे, अशा गोष्टीचे राजकारण करायला नको, असे प्रताप जाधव म्हणाले. प्रताप जाधव यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ठाकरेंच्या शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांकडून जाधव यांच्यावर टीका केला जात आहे.

Prataprao Jadhav Sparks Row
ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

जय गुजरात म्हटले त्यात कुठे चुकलं? प्रताप जाधव काय म्हणाले ?

एकनाथ शिंदे यांच्या जय गुजरात वक्तव्याचे समर्थन करताना केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी संयुक्त महाराष्ट्रात मुंबई गुजरातची राजधानी असल्याचं वक्तव्य केले. सामाजिक कार्यक्रमात आम्हाला बोलावल्यावर आपला स्वाभिमान ठेवत त्यांचाही स्वाभिमान जागृत करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी केलेले वक्तव्य चुकीचं नसल्याचं प्रतापराव जाधव म्हणाले.

Prataprao Jadhav Sparks Row
Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

ठाकरेंनी हिंदुत्व का सोडलं?

शिवाजी पार्क वरूनबाळासाहेब ठाकरे तमाम हिंदू बांधवांनो म्हणायचे. उद्धव ठाकरे ते विसरले त्यांनी हिंदुत्व का सोडलं? याबाबत कोणी विचारत नाही. दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. या म्हणीप्रमाणे त्यांची अवस्था झाल्याची टीकाही जाधवांनी ठाकरेंवर केली. तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

Prataprao Jadhav Sparks Row
Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com