Crime: महामार्गावर रक्तरंजित थरार! शेतीसाठी एकमेकांच्या जीवावर उठले, तरुणाकडून मावस भावावर कोयत्याने सपासप वार

Sambhajinagar Crime: संभाजीनगरमध्ये एका तरुणाने मावस भावावर जीवघेणा हल्ला केला. महामार्गावर त्याने मावस भावावर कोयत्याने सपासप वार केले. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
Crime: महामार्गावर रक्तरंजित थरार! शेतीसाठी एकमेकांच्या जीवावर उठले,  तरुणाकडून मावस भावावर कोयत्याने सपासप वार
Sambhajinagar CrimeSaam Tv
Published On
  • संभाजीनगरमध्ये शेतीच्या वादातून कोयत्याने हल्ला

  • तरुणाकडून मावस भावावर जीवघेणा हल्ला

  • संभाजीनगर महामार्गावर घडली घटना

  • पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे

माधव सावरगावे, संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात कौटुंबिक आणि शेतीच्या वादातून भावानेच आपल्या मावस भावावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीय. ही घटना बिडकीन ते फारोळा गावानजिक महामार्गावरील पुलाजवळ घडली. या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला असून परिसरात खळबळ उडाली आहे. पैठण ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील बिडकीन ते फारोळा गावाजवळील पुलाजवळ ही घटना घडली.

शेतीच्या जुन्या वादातून मावस भावांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर एका भावाने दुसऱ्या भावावर थेट कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात रामेश्वर हरिश्चंद्र लव्हाळे, वय ४० हे गंभीर जखमी झाले. ते फुलंब्री तालुक्यातील गणोरी गावचे रहिवासी आहेत. आरोपीने त्यांच्या पायावर कोयत्याने वार केल्याने मोठी दुखापत झाली. घटनेनंतर जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Crime: महामार्गावर रक्तरंजित थरार! शेतीसाठी एकमेकांच्या जीवावर उठले,  तरुणाकडून मावस भावावर कोयत्याने सपासप वार
Crime: लग्नात रक्तरंजित थरार! आवडतं गाणं न वाजवल्यानं वऱ्हाडी संतापले, नवरदेवाच्या काकाची चाकूने वार करत हत्या

भरदिवसा महामार्गालगत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमीवर ग्रामीण रुग्णालय बिडकिन येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा तपास पोलिस करत आहेत. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Crime: महामार्गावर रक्तरंजित थरार! शेतीसाठी एकमेकांच्या जीवावर उठले,  तरुणाकडून मावस भावावर कोयत्याने सपासप वार
Crime: दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले, घरात घुसून मायलेकीची हत्या; नंतर आरोपीने उचललं टोकाचं पाऊल

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटामध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना बुधवारी घडली. जुन्या वादातून दोन गट आमनेसामने आले होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज परिसरात ही घटना घडली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सायंकाळी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. दोन गटांनी एकमेकांना शिवीगाळ करत दांडक्याने मारहाण केली. यावेळी महिलांना देखील सोडण्यात आले नव्हते. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती.

Crime: महामार्गावर रक्तरंजित थरार! शेतीसाठी एकमेकांच्या जीवावर उठले,  तरुणाकडून मावस भावावर कोयत्याने सपासप वार
Crime: अनैतिक संबंधातून नवऱ्यासोबत कडाक्याचे भांडण, महिलेने ३ मुलांची हत्या केली; नंतर...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com