Samruddhi Mahamarg : धक्कादायक! एकीकडे पाय, दुसरीकडे तोंड; समृद्धी महामार्गा लगत आढळला २ तुकड्यात मृतदेह

Samruddhi Expressway body found in two pieces near Washim : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यात दोन भागांत कुजलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेहाचे तुकडे महामार्गालगत सापडले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
Samruddhi Mahamarg
Samruddhi MahamargSaam tv
Published On

मनोज जैयस्वाल, वाशिम प्रतिनिधी

Mumbai-Nagpur Expressway decomposed body discovery latest update : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गा लगत कुजलेल्या अवस्थेत एका पुरूषाचा मृतदेह आढळला आहे. धक्कादायक म्हणजे, मृतदेह दोन भागात विभागलेला आहे. एकीकडे पाय अन् दुसरीकडे कमरेच्या वरचा भाग दिसतोय. वाशिम जिल्ह्यात मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा मृतदेह नेमका कुणाचा आहे? घातपात झालेला आहे? अपघात आहे? की कुणी इथं मृतदेह आणून टाकला? याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.

वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर मालेगाव ते शेलुबाजार दरम्यान चॅनल २१८ जवळ मुंबई कॉरिडोरवर अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत दोन भागात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. मुंबई कॉरिडोरच्या बॅरिकेटला लागून हा मृतदेह आढळला आहे. दोन भागात हा मृतदेह आढळल्याने हा घातपात आहे की, कुणी हा मृतदेह आणून टाकला हे आता पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. या व्यक्तीचा मृत्यू आठ ते दहा दिवसांपूर्वी झाला असावा, अशी शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास केला जात आहे.

Samruddhi Mahamarg
सांगलीत अग्नितांडव! ३ मजली इमारतीला आग, एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू, आई-बाप, मुलगी अन् नातीचा दुर्दैवी अंत

समृद्धीवर आढळलेला मृतदेह पूर्णपणे कुजलेला असल्याने ओळख पटवणे पोलिसांना कठीण झाले आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. समृद्धी महामार्ग हा मुंबई-नागपूर जोडणारा वेगवान मार्ग असल्याने येथे अपघातांच्या घटना वारंवार घडतात. मात्र, मृतदेह दोन भागांत सापडणे हे भयानक आणि गंभीर आहे. या प्रकणात हत्येची शक्यता नाकारता येत नाही.

Samruddhi Mahamarg
देशात मोठ्या घातपाताचा कट उधळला, डॉक्टराच्या घरातून 300 किलो RDX, एके ४७ अन्...

दरम्यान, या घटनेमुळे समृद्धी महामार्गाच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित झाला आहेत. या मृतदेहाबाबत अथवा घटनेबाबत माहिती असल्यास तात्काळ संपर्क करावा, असे आवाहन वाशिम पोलिसांकडून करण्यात आले आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच मृतदेहाची ओळख आणि मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणाचा सध्या कसून तपास करण्यात येत आहे. हा मृतदेह कुणाचा आहे? घातपात आहे की अपघात? याचा तपास केला जात आहे.

Samruddhi Mahamarg
BMC Election : भावासोबत युती नाहीच? मनसेने स्वबळावर केली तयारी, मुंबईत १२५ जागांवर लढण्याची शक्यता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com