Crime: दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले, घरात घुसून मायलेकीची हत्या; नंतर आरोपीने उचललं टोकाचं पाऊल

Virar Crime: विरारमध्ये मायलेकीची घरात घुसून हत्या करण्यात आली. विरार पश्चिमेला उच्चभ्रू सोसायटीत ही घटना घडली. हत्येनंतर आरोपीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आरोपीची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
Crime: दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले, घरात घुसून मायलेकीची हत्या; नंतर आरोपीने उचललं टोकाचं पाऊल
Virar CrimeSaam Tv
Published On

Summary:

  • विरारमध्ये दुहेरी हतयाकांडाची घटना घडली

  • मायलेकीची घरात घुसून हत्या करण्यात आली

  • आरोपीने तिथेच आत्महत्याचा प्रयत्न केला

  • आरोपीची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत

मनोज तांबे, विरार

विरारमध्ये दुहेरी हत्याकांडाची घटना घडली. घरात घुसून मायलेकीची धारदार शस्त्राने सपासप वार करत हत्या करण्यात आली. आरोपीने स्वत:वर वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला. या हत्याकांडामुळे विरारमध्ये एकच खळबळ उडाली. विरार पश्चिमेच्या विवा कॉलेज परिसरात ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोघींचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी आरोपीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विरारच्या विवा कॉलेज परिसरातील पूनम आकांक्षा या उच्चभ्रू सोसायटीत ही दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना घडली. भाड्याने राहणाऱ्या मायलेकीची हत्या करण्यात आली. नॅन्सी मिश्रा (वय २४ वर्षे) आणि तिची आई सरिता मिश्रा असं हत्या झालेल्या मायलेकींची नावं आहेत. शिवम उपाध्याय या तरुणाने घरात घुसून साहित्याची तोडफोड करत धारदार शस्त्राने मायलेकीवर असंख्य वार करण्यात आले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोघींचा जास्त रक्तस्राव झाल्यामुळे जागीच मृत्यू झाला.

Crime: दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले, घरात घुसून मायलेकीची हत्या; नंतर आरोपीने उचललं टोकाचं पाऊल
Crime: शेजाऱ्याकडून १४ वर्षीय मुलीवर बलात्कार; फूस लावून शेताकडे नेलं, तोंड अन् हात-पाय बांधून भयंकर कृत्य

घरामध्ये दोघींचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. हल्ल्यानंतर आरोपी शिवम उपाध्यायने स्वतःचाही जीव संपवण्याचा प्रयत्न केला. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. त्याच्यावर संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मायलेकीच्या हत्येमागचे कारण अद्याप समोर आले नाही. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या हत्याकांडामुळे विरार हादरले आहे.

Crime: दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले, घरात घुसून मायलेकीची हत्या; नंतर आरोपीने उचललं टोकाचं पाऊल
Crime: गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला रॉकेल ओतून जिवंत जाळलं; प्रपोज करते म्हणत खुर्चीवर बसवलं, डोळ्यांवर पट्टी अन् हात-पाय बांधले नंतर...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com