Crime: शेजाऱ्याकडून १४ वर्षीय मुलीवर बलात्कार; फूस लावून शेताकडे नेलं, तोंड अन् हात-पाय बांधून भयंकर कृत्य

Bihar Crime News: बिहारमध्ये १४ वर्षीय मुलीवर शेजारी राहणाऱ्या तरुणाने बलात्कार केला. पीडित मुलीला फूस लावून त्याने शेतात नेलं त्याठिकाणी तिचे हात-पाय बांधून त्याने बलात्कार केला. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली.
Crime: शेजाऱ्याकडून १४ वर्षीय मुलीवर बलात्कार; फूस लावून शेताकडे नेलं, तोंड अन् हात-पाय बांधून भयंकर कृत्य
Bihar Crime NewsSaam Tv
Published On

Summary -

  • बिहारमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार

  • शेजारी राहणाऱ्या तरुणाचं भयंकर कृत्य

  • १४ वर्षीय मुलीला शेतात नेऊन केला बलात्कार

  • पोलिसांनी काही तासांच आरोपीला केली अटक

बिहारमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. पश्चिम चंपारण जिल्ह्यातील एका गावात मुलीवर बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी संदीप कुमारला अटक केली. आरोपीने सोमवारी संध्याकाळी ७ वाजता शेजारी राहणाऱ्या १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून मक्याच्या शेतात नेलं. त्याठिकाणी त्याने मुलीचे तोंड, हात अन पाय बांधून तिच्यावर बलात्कार केला. या घटनेने बिहार हादरले.

आरोपी पीडितेवर बलात्कार करत असताना त्याचे दोन मित्र पाळत ठेवून होते. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी रात्रभर मुलीचा शोध घेतला पण ती कुठेच सापडली नाही. मंगळवारी सकाळी तिचा शोध घेणाऱ्या गावकऱ्यांना ती मक्याच्या शेतात सापडली. मुलीने गावकऱ्यांना तिच्यासोबत झालेला प्रकार सांगितले. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.

Crime: शेजाऱ्याकडून १४ वर्षीय मुलीवर बलात्कार; फूस लावून शेताकडे नेलं, तोंड अन् हात-पाय बांधून भयंकर कृत्य
Crime: गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला रॉकेल ओतून जिवंत जाळलं; प्रपोज करते म्हणत खुर्चीवर बसवलं, डोळ्यांवर पट्टी अन् हात-पाय बांधले नंतर...

पोलिसांनी मुख्य आरोपी संदीप कुमारला मंगळवारी सकाळी अटक केली. एफआयआरमध्ये आणखी दोन आरोपींची नावं आहेत. ते दोघे मुख्य आरोपीचे मित्र आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या घटनेमुळे गावात संतापाची लाट आहेत. पोलिसांनी आरोपीविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी केली आहे.

Crime: शेजाऱ्याकडून १४ वर्षीय मुलीवर बलात्कार; फूस लावून शेताकडे नेलं, तोंड अन् हात-पाय बांधून भयंकर कृत्य
Crime: नगरपरिषदेत रक्तरंजित थरार! सभापती अन् कार्यकारी अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या; डोक्यात गोळी घुसल्याने एकाचा मृत्यू

बिहारच्या सहर्षा जिल्ह्यातील काशनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात अशीच धक्कादायक घटना घडली. या ठिकाणी एका ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. पोलिसांच्या सतर्कतेमुळे आरोपीला पळून जाण्यापासून रोखण्यात आले आणि त्याला रात्री उशिरा अटक करण्यात आली. गेल्या रविवारी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. ललित सदा असे नाव असलेला आरोपी दोन मुलांचा बाप आहे. गुन्हा केल्यानंतर अटक टाळण्यासाठी तो मक्याच्या शेतात लपून बसला होता.

Crime: शेजाऱ्याकडून १४ वर्षीय मुलीवर बलात्कार; फूस लावून शेताकडे नेलं, तोंड अन् हात-पाय बांधून भयंकर कृत्य
Pune Crime: भररस्त्यात भाजप कार्यकर्त्याची हत्या, ९ गोळ्या झाडत जागीच संपवलं; पुणे हादरले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com