Crime: नगरपरिषदेत रक्तरंजित थरार! सभापती अन् कार्यकारी अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या; डोक्यात गोळी घुसल्याने एकाचा मृत्यू

Firing In Nagar Parishad Office: बिहारमधील नगरपरिषद कार्यालयात गोळीबाराची घटना घडली. हल्लेखोरांनी नगरपरिषदेत घुसून सभापती आणि कार्यकारी अधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला.
Crime: नगरपरिषदेत रक्तरंजित थरार! सभापती अन् कार्यकारी अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या; डोक्यात गोळी घुसल्याने एकाचा मृत्यू
Bihar CrimeSaam tv
Published On

Summary:

  • बिहारमध्ये नगरपरिषदेत गोळीबाराची घटना घडली

  • सभापती आणि कार्यकारी अधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या

  • या गोळीबारात कार्यकारी अधिकाऱ्याचा मृत्यू झाला

  • सभापतींच्या डोक्यात गोळी घुसली असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे

बिहारच्या नगरपरिषदेत हत्याकांडाची घटना घडली. भागलपूर जिल्ह्यातील सुलतानगंज नगर परिषदेच्या कार्यालयात घुसून सभापती आणि कार्यकारी अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळीबारामध्ये कार्यकारी अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला तर डोक्यात गोळी घुसल्यामुळे सभापतीची प्रकृती गंभीर आहे. या घटनेमुळे बिहारमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिस सध्या या हत्याकांड प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळारी दुपारी सुलतानगंज नगर परिषदेच्या कार्यालयात घुसून हल्लेखोरांनी सभापती आणि कार्यकारी अधिकारी यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात कार्यकारी अधिकाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर नगर परिषदेचे सभापती राजकुमार गुड्डू गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्यात गोळी घुसली. त्यांच्यावर भागलपूर येथील मायागंज रुग्णालयात उपचार करण्यात आले आणि पुढील उपचारासाठी सुलतानगंज रेफरल रुग्णालयात हलवण्यात आले.

Crime: नगरपरिषदेत रक्तरंजित थरार! सभापती अन् कार्यकारी अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या; डोक्यात गोळी घुसल्याने एकाचा मृत्यू
Crime: गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला रॉकेल ओतून जिवंत जाळलं; प्रपोज करते म्हणत खुर्चीवर बसवलं, डोळ्यांवर पट्टी अन् हात-पाय बांधले नंतर...

गोळीबाराच्या या घटनेमुळे प्रशासकीय विभागात खळबळ उडाली आहे. पोलिस अधीक्षक आणि एसएसपी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून ते तपास करत आहेत. सरकारी कार्यालयात गोळीबार करून गुन्हेगारांनी सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारला आणि बिहार पोलिसांच्या विश्वासार्हतेला आव्हान दिले आहे. या घटनेमुळे बिहार हादरले आहे.

Crime: नगरपरिषदेत रक्तरंजित थरार! सभापती अन् कार्यकारी अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या; डोक्यात गोळी घुसल्याने एकाचा मृत्यू
Yavatmal Crime: पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय; झोपेतच तरुणावर कुऱ्हाडीने सापासप वार

या घटनेनंतर नगरपरिषदेचे कार्यालय सील करण्यात आले आहे. बाहेरील कोणालाही प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली. नगरपरिषदेच्या कार्यालयामध्ये ८ पेक्षा जास्त गोळ्या झाडण्यात आल्या. सभापतींवर ५ गोळ्या झाडण्यात आल्या. तीन आरोपी दुचाकीवरून आले होत त्यांनी दोघांवर गोळीबार केला. गोळीबाराने संपूर्ण परिसर हादरून गेला. गोळीबारामागचे कारण अद्याप समोर आले नाही. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिस सीसीटीव्ही फूटेज तपासत आहेत.

Crime: नगरपरिषदेत रक्तरंजित थरार! सभापती अन् कार्यकारी अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या; डोक्यात गोळी घुसल्याने एकाचा मृत्यू
Kalyan Crime : श्वानामुळं खडवली नदीकाठच्या हत्येचा उलगडा, ३०० सीसीटीव्हीतून समोर आला भयानक चेहरा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com