Yavatmal Crime: पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय; झोपेतच तरुणावर कुऱ्हाडीने सापासप वार

Yavatmal Crime: पत्नीच्या संबंध असल्याच्या संशयावरून झोपेत असलेल्या तरुणावर एका व्यक्तीने कुऱ्हाडीने हल्ला करत त्याची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
Yavatmal Crime:
YAVATMAL MURDER CASE: YOUTH HACKED TO DEATH WITH AXE OVER SUSPECTED AFFAIRsaam tv
Published On
Summary
  • आरोपीच्या पत्नीसोबत मृत तरुणाचे अनैतिक संबंध

  • अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून हत्या

  • पोलिसांनी आरोपीला अटक केली

संजय राठोड, साम प्रतिनिधी

घराच्या छतावर झोपलेल्या तरुणावर कुऱ्हाडीने वार करत त्याची हत्या केल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातील वडगाव जंगल भागात घडली. अनैतिक संबंधाच्या संशयातून या तरुणाची हत्या झाली असल्याचा शंका आहे. या हत्याप्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. आशिष उर्फ कृष्णा खंडूजी कांबळे (वय २२) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

Yavatmal Crime:
होणाऱ्या नवऱ्यासोबत फिरायला गेली, वाटेत दोघांनी अडवलं; जंगलात नेऊन तरुणीवर सामूहिक अत्याचार

वडगाव जंगल पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोरीसिंह येथे एका घराच्या छतावर आशिष उर्फ कृष्णा खंडूजी कांबळे झोपलेला होता. त्यावेळी त्याच्यावर आरोपीनं कुऱ्हाडीने हल्ला चढवला. त्याच्या हाता, पायावर वार केला. पांडुरंग प्रल्हाद कांबळे (वय ४०) असं आरोपीचे नाव आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, पांडुरंग कांबळे याच्या पत्नीसोबत कृष्णा कांबळेचे अनैतिक संबंध होते. त्याच्या राग पांडुरंग कांबळेच्या मनात होता. समाजात झालेल्या बदनामी झाल्यामुळे पांडुरंग कांबळेने आशिषच्या हत्येचा कट रचला.

Yavatmal Crime:
Crime news: धक्कादायक! 'जेवणात चिकन का नाही', पती जोरजोरात ओरडला; वैतागलेल्या पत्नीने विळ्याने चिरला गळा

सोमवारी रात्री आशिष घराच्या छतावर झोपलेला असताना पांडुरंगने कुर्ऱ्हाडीने त्याच्यावर हल्ला केला. पांडुरंगने आशिषचा भाऊ शरद खंडूजी कांबळे याच्यावरही कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात शरद जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान या हत्याकांडाची माहिती मिळताच या घटनेची माहिती मिळताच वडगाव जंगल पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून आरोपी पांडुरंगला अटक केली आहे.

बायकोच्या अफेअरमुळे पोलीस कर्मचाऱ्याने आयुष्य संपवलं

पत्नीकडून संपत्ती आणि घटस्फोटासाठी सुरू असलेला मानसिक छळ असह्य झाल्याने पोलीस कर्मचाऱ्याने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली. पोलिसांनी मृत पोलीस कर्मचाऱ्याची पत्नी आणि तिच्या बॉयफ्रेंडविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शीलरत्न भीमराव बेलेकर असे आत्महत्या केलेल्या पोलिसाचे नाव आहे. त्यांची ३२ वर्षीय बायको रुचिका बेलेकरचे महेश मेश्रामसोबत प्रेमसंबंध होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com