होणाऱ्या नवऱ्यासोबत फिरायला गेली, वाटेत दोघांनी अडवलं; जंगलात नेऊन तरुणीवर सामूहिक अत्याचार

Gang Rape Case In Fatehpur Uttar Pradesh Latest Update: उत्तरप्रदेशातील फतेहपूरमध्ये होणाऱ्या नवऱ्यासोबत गेलेल्या तरुणीवर सामूहिक अत्याचाराची संताजनक घटना घडली आहे.
Gang Rape Case In Fatehpur Uttar Pradesh
Gang Rape Case In Fatehpur Uttar Pradeshsaam tv
Published On

उत्तरप्रदेशातील फतेहपुर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबत फिरायला गेलेल्या एका तरुणीवर सामूहिक अत्याचार आणि मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत स्थानिक पोलीस निरीक्षकाला तात्काळ हजर केले.

Gang Rape Case In Fatehpur Uttar Pradesh
Shocking : मटण अर्धवट शिजलं, मित्रांसमोरच नवऱ्यानं वाद घातला; अपमान सहन न झाल्यानं बायकोनं संपवली जीवनयात्रा

मिळालेल्या माहितीनुसार, 24 एप्रिल रोजी पीडित तरुणी तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत जात असताना ते वाटेत एका कालव्याजवळ दोघे थांबले असताना तिथे एक तरुण आला आणि त्याने आपल्या इतर दोन साथीदारांना तिथे बोलावून घेतले. तिघांनी मिळून या जोडप्याला धमकावून जवळच्या जंगलात नेले.

Gang Rape Case In Fatehpur Uttar Pradesh
Crime news: घरचे बाहेर गेले असताना घरात घुसला अन्..; शेजारी राहणाऱ्या तरूणाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, राज्यात खळबळ

तिथे या नराधमाने बलात्कार केला, तर तिघांनी मिळून तिच्यावर अत्याचार करत मारहाण केली. या नराधमांनी तिचे व्हिडिओ देखील काढले. सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून 2500 रुपये उकळले. घटनेनंतर पीडित तरुणी तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली होती, परंतु पोलिसांनी तिची तक्रार गांभीर्याने घेतली नाही. अखेर पीडितेच्या होणाऱ्या नवऱ्याने पोलीस अधीक्षक (SP) कार्यालयात धाव घेतली. एसपींच्या आदेशानंतर या प्रकरणाची चौकशी झाली आणि तक्रार खरी असल्याचे सिद्ध झाले.

Gang Rape Case In Fatehpur Uttar Pradesh
Crime: सोबत बसून दारू प्यायले, नंतर नवऱ्याने बायकोला संपवलं; शिर धडावेगळं करून गावभर फिरवलं, थरकाप उडवणारा VIDEO

या प्रकरणात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. तिसरा आरोपी फरार झाला असून त्याच्यावर 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com