

सोलापुरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीच्या पायाला झोपेत पाय लागल्याने त्याचा खून करण्यात आला आहे. या किरकोळ वादातून तरुणाची हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सोलापूरच्या मीनाक्षी नगरमध्ये ही घटना घडली असून यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे.
महेश गुरुसिद्धप्पा सावळतोटे असं या मृत तरुणाचं नाव असल्याची माहिती आहे. तर, आरोपीचं नाव नागनाथ जवळकोठे असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.
ज्या दिवशी ही घटना घडली, तेव्हा महेश तेलगू शाळेजवळ असलेल्या मोकळ्या जागेत झोपला होता. तेव्हा झोपेत असताना त्याचा पाय महेशच्या पायाला लागला. दरम्यान, या घटनेनंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला. सुरुवातीला शिवीगाळ झाली, मात्र नंतर या वादाचे रूपांतर भांडणात झाले.
यावेळी रागाच्या भरात सोमनाथने जवळचा दगड महेशच्या डोक्यात घातला. हा हल्ला इतका जोरदार होता की महेश गंभीर जखमी झाला आणि तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. आजूबाजूच्या लोकांना समजण्यापूर्वीच महेशचा मृत्यू झाला.
महेश आणि सोमनाथ या दोघांनाही दारूचे व्यसन असल्याचं समोर आलं आहे. महेश रोजंदारीवर मजुरी करून स्वतःचे पोट भरत होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दारूच्या नशेत असताना हा वाद अधिक चिघळला असण्याची शक्यता आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे. त्यानंतर पोलिसांनी सोमनाथला अटक केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून इतर बाबींचीही शक्यता पडताळण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.