Crime: सोबत बसून दारू प्यायले, नंतर नवऱ्याने बायकोला संपवलं; शिर धडावेगळं करून गावभर फिरवलं, थरकाप उडवणारा VIDEO

Husband Killed Wife: छत्तीसगडमध्ये नवऱ्याने बायकोची निर्घृण हत्या केली. धारदार शस्त्राने वार करत बायकोचे शिर धडावेगळं केलं. त्यानंतर आरोपी बायकोचे शिर घेऊन गावभर फिरला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
Crime: सोबत बसून दारू प्यायले, नंतर नवऱ्याने बायकोला संपवलं; शिर धडावेगळं करून गावभर फिरवलं, थरकाप उडवणारा VIDEO
Saam Tv
Published On

Summary -

  • छत्तीसगडच्या कोरबामध्ये भयंकर हत्याकांड

  • नवऱ्याने बायकोची निर्घृण हत्या केली

  • हत्या करून शिर धडावेगळं करून गावभर फिरवलं

  • आरोपी स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन शरण आला

छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यामध्ये मन हेलावून टाकणारी घटना घडली. नवऱ्याने बायकोची हत्या केली. धारदार शस्त्राने बायकोचे शीर धडावेगळं केलं. त्यानंतर आरोपीने संपर्ण गावभर शिर फिरवत पोलिस ठाण्यात गेला. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना देखील हादरा बसला. या घटनेमुळे छत्तीसगडमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना छत्तीसडच्या बाल्कोनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बुंदेली गावात घडली. बुधवारी संध्याकाळी सालिक राम नावाच्या एका मुजराने बायकोची हत्या केली. या दोघांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. आरोपीची बायको त्याच्या चारित्र्यावर संशय घेत होती. यावरूनच दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचा. घटनेच्या दिवशी सकाळी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. संध्याकाळी दोघेही सोबत बसून दारू प्यायले. त्यानंतर आरोपीने धारदार चाकूने बायकोवर हल्ला केला. आरोपी ऐवढ्यावर थांबला नाही तर त्याने बायकोची हत्या केल्यानंतर तिचे शिर आणि धड वेगळं केलं.

Crime: सोबत बसून दारू प्यायले, नंतर नवऱ्याने बायकोला संपवलं; शिर धडावेगळं करून गावभर फिरवलं, थरकाप उडवणारा VIDEO
Crime News: व्यायामामुळे बायको झाली फिट; जिमवरून येताच नवऱ्याने केली हत्या, सनकी 7 तास मृतदेहाजवळ बसून राहिला

त्यानंतर आरोपीने बायकोचे शिर एका पोत्यात भरून मोटरसायकलवरून अख्ख्या गावभर फिरवलं. गावातील लोकांना तो सांगत होता की मी बायकोची हत्या केली. काही ठिकाणी तर त्याने पोत्यातून बायकोचे शिर काढून सर्वांना दाखवले देखील. आरोपीचे हे रौद्ररूप पाहून गावकरी प्रचंड घाबरले. बायकोचे शिर गावभर फिरवल्यानंतर तो पोलिस ठाण्यात गेला. आरोपीने पोलिसांना पोत्यातील बायकोचे शिर दाखवले ते पाहून पोलिसही हादरले.

Crime: सोबत बसून दारू प्यायले, नंतर नवऱ्याने बायकोला संपवलं; शिर धडावेगळं करून गावभर फिरवलं, थरकाप उडवणारा VIDEO
Crime: १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार, घरी जाताना अपहरण करत फ्लॅटवर नेलं अन्...; पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न

या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. आरोपीने हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांनी जप्त केला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासातून कौटुंबिक वादातून आणि चारित्र्याच्या संशयावरून ही घटना घडली. पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

Crime: सोबत बसून दारू प्यायले, नंतर नवऱ्याने बायकोला संपवलं; शिर धडावेगळं करून गावभर फिरवलं, थरकाप उडवणारा VIDEO
Crime news: पत्नीचं दुसरीकडे अफेअर, पतीची दिली सुपारी; नवऱ्याचा मृत्यू झाल्याचं समजून प्रियकराला केले १०० पेक्षा जास्त फोन आणि...!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com