मोठी बातमी! शरद पवार गटाच्या सोशल मीडिया प्रमुखाला अटक; काय आहे प्रकरण?

NCP Social Media Head Arrested: पिंपरी-चिंचवडच्या सायबर पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडिया राज्य प्रमुख महादेव बाळगुडे यांना अटक केली आहे. आक्षेपार्ह पोस्ट आणि नक्षलवाद्यांच्या विचारसरणीचे समर्थन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
Cyber police detain NCP (Sharad Pawar faction) social media leader in Pimpri-Chinchwad over controversial online posts.
Cyber police detain NCP (Sharad Pawar faction) social media leader in Pimpri-Chinchwad over controversial online posts.
Published On

गोपाल मोटघरे, साम प्रतिनिधी

सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी आणि कथित नक्षली विचारसरणीचे समर्थन केल्याच्या आरोपावरून पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सोशल मीडिया विभागाचे राज्य प्रमुख महादेव बालगुडेला अटक केली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Cyber police detain NCP (Sharad Pawar faction) social media leader in Pimpri-Chinchwad over controversial online posts.
Amit Thackeray: मराठी बोलायला विरोध असेल तर रिक्षाचालकांनी गावी जावे, अमित ठाकरेंनी स्षष्टचं सांगितलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालगुडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो मॉर्फ करून तो आक्षेपार्ह स्वरूपात सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा आरोप आहे. महादेव बालगुडे यांनी नक्षलवादी नेता हिडमा याचे उदात्तीकरण करणारी सामग्री देखील शेअर केली होती. एका वकिलाने या संदर्भात पिंपरी चिंचवड शहर सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी गुन्हा नोंदवला आणि बालगुडे यांना अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास आता पिंपरी चिंचवड शहर सायबर पोलीस करत आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो मॉर्फ करून तो आक्षेपार्ह स्वरूपात सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा गंभीर आरोप बालगुडे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. सायबर पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत बालगुडे यांना बेड्या ठोकल्या. बालगुडे यांच्याविरोधात वकिलांनी केलेल्या तक्रारीत मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलीन करणे आणि देशविघातक शक्तींचे समर्थन करणे अशा मुद्द्यांवर भर देण्यात आला होता.

Cyber police detain NCP (Sharad Pawar faction) social media leader in Pimpri-Chinchwad over controversial online posts.
Shaktipeeth Highway: एका विशिष्ट 'देवा'ला शेतकऱ्यांची सुपीक जमीन लागते; जयंत पाटलांची फडणवीसांवर बोचरी टीका

तक्रारीची गांभीर्याने दखल घेत सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आणि तत्परतेने महादेव बालगुडे यांना अटक केली. बालगुडे यांच्या अटकेनंतर पिंपरी-चिंचवडसह राज्यभरातील राजकीय वातावरण तापले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com